Vaccination Saam TV
देश विदेश

कोरोनापासून मुलांचं संरक्षण करणार 'ही' लस; NTAGI कडून मंजुरी

५ ते १२ वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाच्या (Covid 19) रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचदरम्यान एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहानं (NTAGI) १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची कोव्होव्हॅक्स (Covovax) लसीच्या वापरास मंजुरी दिली आहे. अलीकडेच, करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी लसीकरणावर जोर देण्याच्या सूचना केल्या होत्या. अशातच आता कोव्होव्हॅक्स लसीला मंजुरी मिळाल्यामुळं लसीकरण मोहिमेला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुलांसाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेत कोव्होव्हॅक्स लशीचाही समावेश करण्यात यावा, असं आवाहन सीरम इन्स्टिट्युटनं सरकारला पत्र पाठवून केलं होतं. सीरम इन्स्टिट्युटकडून डीसीजीआय अर्थात ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियालाकडेही परवानगीकरिता अर्ज केला होता. त्यानंतर डीसीजीआयनं कोव्होव्हॅक्सच्या वापराला परवानगीही दिली होती. त्यानंतर, १२ ते १७ वयोगटातील मुलांना लस देण्यासंदर्भात एनटीएजीआयच्या २९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत सीरम इन्स्टिट्युटच्या कोव्होव्हॅक्स लशीच्या वापराला औपचारिक मंजुरी मिळाली आहे. त्यामुळं आता ही लस १२ ते १७ वयोगटातील मुलांना देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नॅशनल टेक्निकल अॅव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) ने ५ ते १२ वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT