Vaccination Saam TV
देश विदेश

पॉझिटिव्ह बातमी! आता ६ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांनाही मिळणार लसीचा डोस

२ महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : भारतात आता ६ ते १२ वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सिन या भारत बायोटेकच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. २ महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कारण आता देशाच्या राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पुन्हा कोरोना (Corona) रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे. कर्नाटक सरकारने (Karnatak) देखील आता मास्कची सक्ती केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता लहान मुलांच्या लसीकरनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून भारतात आता ६ ते १२ वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी Covaxin या भारत बायोटेकच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

ही मान्यता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) आज मंगळवार २६ एप्रिल रोजी दिली आहे. ही मंजुरी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी देण्यात आली असून भारत बायोटेकची ही लस दोन डोसमध्ये दिली जाणार आहे. शिवाय DCGI ने कंपनीला पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी सुरक्षिततेबाबतची माहिती देखील सादर करण्यास सांगितले आहे. शिवाय पाच महिन्यांसाठीचा सेफ्टी डेटा देखील द्यावा लागणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT