Workers protest in Noida industrial area turns aggressive over salary and overtime disputes saam tv
देश विदेश

पगारवाढीसाठी कंपनीत दंगल, कंपनीवर 'डबल गेम'चा आरोप

Labour Unrest in Noida: कामगाराची पिळवणुक हा काही नवीन विषय नाही.... मात्र नोएडात झालेल्या आंदोलनात पगारवाढीसाठी कामगार आक्रमक झाले... त्यामुळे कंपनीच्या पिळवणुकीविरोधात कामगारांच्या आंदोलनाला दंगलीचं रुप कसं मिळालं ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ही दंगल उसळलीय... देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडमध्ये... चकचकीत काचांच्या इमारती आणि मल्टिनॅशनल कंपन्यांच्या आड लपलेलं कामगारांच्या शोषणाचं विदारक वास्तवच त्यामुळे समोर आलयं...पगारवाढ मिळत नसल्यानं इथल्या कामगारांनी थेट आंदोलनाचं हत्यार उगारलं आणि फरिदाबाद ते नोएडापर्यंतच्या औद्योगिक पट्ट्यात आंदोलनाची आग पेटत गेली,..

मात्र आंदोलनामागचं कारण फक्त पगारवाढ किंवा ओव्हर टाईमच्य़ा मोबदल्या पुरतं मर्यादीत नाही तर या प्रकरणात कामगारांची कंपन्यांकडून कशी पिळवणूक होतं आहे हे ही सामोर आलंय.कंपनीने 8 तासांऐवजी 10-12 तास काम करून घेतल्याचा आरोप कामगारांनी केला...ओव्हरटाईम करूनही कर्मचाऱ्यांना केवळ 9 ते 11 हजार रुपये पगार दिला जायचा.ओव्हरटाईमचे दुप्पट वेतन मिळायचे नाही....आणि वर्षाला फक्त 200 ते 300 रुपये पगारवाढ दिली जायचा...

स्वत:च्या पगार वाढीसाठी खासगी कंपन्यांचे कर्मचारी रस्तावर उतरलेत. गेले तीन दिवस यासाठी आंदोलन सुरु आहे..कंपनीन अजून तरी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही.. कंपन्यांकडून कामगार कायद्याचं उल्लंघन करून कामगारांचं शोषण होत असेल त्यावर लगेच उपाय शोधले पाहितेत .. अन्यथा अन्यायाविरोधात पेटलेली ही आग नंतर थांबवणं कठीण होऊन जाईल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : रावसाहेब दानवेंचा भाऊ आमदार होणार, जालन्यातून नाव चर्चेत, भाजप तिकीट देणार?

Cricketer death: सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूला हार्ट अटॅक; 39 व्या वर्षी झालं निधन

अपघातग्रस्तांना वाचवायला पळाला अन् दुसऱ्या बसने उडवला, टोलनाका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

औषधं घ्यायची गरज नाही, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' चहा

Maharashtra News Live Update: पेट्रोल,डिझेल दरात गेली दहा दिवसात सलग चौथ्यांदा वाढ,सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला काञी

SCROLL FOR NEXT