Noida Wall Collapsed Saam Tv
देश विदेश

Noida Wall Collapsed: नोएडाच्या सेक्टर-21 मध्ये भिंत कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांना बाहेर काढण्यात यश, चौकशीचे आदेश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - नोएडामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नोएडातील सेक्टर 21 मध्ये भिंत कोसळल्याने (Wall Collapsed) 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जलवायू विहारमध्ये पॉवर हाऊससमोर ही भिंत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Noida Wall Collapsed)

भिंतीलगत नाली बनवण्याचे काम सुरू असताना अचानक भिंत कोसळल्याने हा अपघात झाला. सध्या 3 जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे.

नोएडाचे डीएम यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, नोएडा सेक्टर 21 मधील जलवायू विहारजवळ ड्रेनेज दुरुस्तीच्या कामाचे कंत्राट दिले होते. मजूर विटा काढत असताना अचानक भिंत कोसळली. या घटनेची चौकशी केली जाईल. या घटनेत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे.बचावकार्य सुरू असून जखमींबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.

योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले शोक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडामध्ये भिंत कोसळल्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींच्या उपचारासाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

Maharashtra News Live Update: अजित दादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT