nitish kumar news  Saam tv
देश विदेश

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Nitish Kumar news : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं महागात पडलं आहे. CM नितीश कुमार यांच्याविरोधात पोलिसांत FIR दाखल करण्यात आलाय.

Vishal Gangurde

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात एफआयआर

मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याचा आरोप नितीश कुमार यांच्याविरोधात करण्यात आलाय

इल्तिजा मुफ्ती यांनी तक्रारीची माहिती सोशल मीडियावर दिलीये

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एका कार्यक्रमात मुस्लिम महिलेचा हिजाब ओढणे महागात पडलं आहे. नितीश कुमार यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. महबूबा मुफ्ती यांच्या मुलीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा यांनी या प्रकरणाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केली आहे.

इल्तिजा यांनी पोस्ट करत म्हटलं की,'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात कोठी बाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. एका मुस्लिम महिलेचा हिजाब बळजबरीने ओढणे म्हणजे तिचा अपमान करणे होय. या प्रकरणात जम्मू-काश्मीरचे पोलीस लक्ष घालतील'.

नितीश कुमार यांनी हिजाब ओढल्याने त्यांच्यावर चहूबाजूने टीका होत आहे.इल्जिता यांनी हिजाब आणि बुरख्याचं समर्थम केलं . त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची प्रत देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे.

इल्तिजा यांनी पोलिसांना म्हटलं की, 'सर, मी तुमचे लक्ष एका घृणास्पद घटनेकडे वेधत आहेत. या प्रकरणात मुस्लिम महिलांच्या भावना दुखावल्या आहेत'. इल्तिजा यांनी पत्रात म्हटलं की, 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका युवा मुस्लिम डॉक्टर महिलेच्या चेहऱ्यावरील हिजाब ओढण्याचा प्रयत्न केला. ही बाब लाजीरवाणी आहे. यावेळी मंचावरील बिहारचे उपमुख्यमंत्र्यांसहित इतर लोक हसत होते'.

पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती यांच्या तक्रारीवर भाजप नेते गिरीराज सिंह यांनी निशाणा साधला. गिरीराज सिंह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना इल्तिजा यांनी म्हटलं की, 'या व्यक्तीचं तोंड स्वच्छ करण्यासाठी फिनेलची गरज लागेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

SCROLL FOR NEXT