देश विदेश

Nigeria Attack: भयंकर! नायजेरियाच्या सैन्य दलावर आत्मघातकी हल्ला, भीषण स्फोटात २७ जवानांचा मृत्यू

Nigeria Attack news : नायजेरियाच्या सैन्य दलावर आत्मघातकी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सैन्य दलातील २७ जवानांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

Nigeria Attack: नायजेरियाच्या उत्तर पूर्व भागात आत्मघातकी हल्ला झाल्याची भीषण घटना घडली आहे. नायजेरियाच्या घटनेत कमीत कमी २७ जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वृत्त संस्था एएफपीच्या माहितीनुसार, नायजेरियाच्या सैनिकांनी बर्नो आणि योबे राज्यादरम्यान असणाऱ्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर आक्रमण केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे.

एका सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी एएफपी वृत्त संस्थेला सांगितलं की, 'आत्मघातकी हल्ल्यात २७ सैनिक मारले गेले. यात काही कमांडर देखील होते. काही इतर लोक देखील या घटनेत जखमी झाले आहेत. मागील काही वर्षातील सर्वात मोठा आत्मघातकी हल्ला असल्याचं बोललं जात आहे.

दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'आत्मघातकी हल्ला केला, त्यावेळी चारही बाजूला अंधार होता. यामुळे चारही बाजूंना सैनिकांना स्पष्ट दिसत नव्हतं. या हल्ल्यातील जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे'.

आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेलं वाहन झाडाझुडपात लपवून ठेवलं होतं. याच वाहनाला एका सैनिकाच्या वाहनाने धडक दिली. त्यानंतर हा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. 'तिंबकटू त्रिकोण' या भागात भीषण हल्ला झाला आहे. या आधी हा विभाग बोको हराम या संघटनेच्या ताब्यात होता.

ISWAP या संघटनेने 2016 साली बोको हराम या संघटनेतून फुटून उत्तर-पूर्व भागात दहशतवादी संघटना तयार केली. या संघटनेने आता बोको हरामच्या अड्ड्यावर कब्जा करणे सुरु केले आहे. यामध्ये तिंबकटू त्रिकोण आणि सांबिसा जंगलाचा समावेश आहे. ही संघटना रस्त्याच्या किनाऱ्यावरील खाणीत सुरुंग लावणे किंवा वाहनांमध्ये स्फोटके ठेवून सैनिकांना टार्गेट करते. जुलै महिन्यात सात सैनिक मारले गेले होते. त्यांच्या वाहनाने खाणीला धडक दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT