Female MP Show Nude Photo Saam Tv News
देश विदेश

'हा माझा न्यूड फोटो आहे पण...', महिला खासदाराने संसदेत दाखवला स्वत:चा नग्न फोटो, सर्व खासदार स्तब्ध; नेमकं काय घडलं?

Female MP Show Nude Photo : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) लोकांचं काम खूप सोपे करत असताना, त्याचा काही चुकीचा वापर लोकांचं जीवन उद्ध्वस्त करत आहेत. कारण एआयच्या मदतीने कोणत्याही फोटोशी छेडछाड केली जाऊ शकते.

Prashant Patil

न्यूझीलंड : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) लोकांचं काम खूप सोपे करत असताना, त्याचा काही चुकीचा वापर लोकांचं जीवन उद्ध्वस्त करत आहेत. कारण एआयच्या मदतीने कोणत्याही फोटोशी छेडछाड केली जाऊ शकते. त्याचे ताजे उदाहरण न्यूझीलंड संसदेत पाहायला मिळाले. गेल्या महिन्यात न्यूझीलंड संसदेत एका महिला खासदाराने स्वतःचा नग्न फोटो दाखवला आणि लोकांना त्याची वास्तविकता सांगितली.

एसीटी पक्षाच्या खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी गुगलवरील एका वेबसाइटच्या मदतीने काही मिनिटांतच त्यांचा बनावट फोटो तयार केला आणि २४ मे रोजी संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हा फोटो दाखवला आणि म्हणाल्या, 'हा माझा नग्न फोटो आहे, पण तो खरा नाही. माझे डीपफेक फोटो तयार करण्यासाठी मला ५ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला', असं त्या म्हणाल्या. संसदेत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'मी संसदेच्या इतर सदस्यांचे लक्ष वेधलं की हे काम किती सोपं आहे आणि त्यामुळे किती शोषण आणि नुकसान होत आहे, विशेषतः तरुणींचं.

पुढे त्या म्हणाल्या की, संसदेत त्यांचा फोटो दाखवणं हा एक अतिशय भयानक अनुभव होता. परंतु लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागू नये म्हणून त्यांना या विषयावर कठोर कायदे बनवायचे होते. त्या म्हणाल्या की सध्या न्यूझीलंडचे कायदे डीपफेकशी संबंधित गुन्ह्यांचा थेट समावेश करत नाहीत, जरी काही नियम डिजिटल हानी आणि छळाशी संबंधित आहेत.

खासदार मॅकलर आता डीपफेक डिजिटल हार्म अँड एक्सप्लॉयटेशन बिल नावाच्या एका नवीन विधेयकाला पाठिंबा देत आहेत. ज्याद्वारे रिव्हेंज पॉर्न आणि खासगी व्हिडिओंशी संबंधित जुने कायदे अपडेट केले जातील. परवानगीशिवाय डीपफेक तयार करणे किंवा शेअर करणे गुन्हा मानला जाईल. याशिवाय, पीडितांना अशी सामग्री काढून टाकण्याचा अधिकार मिळेल आणि न्याय मिळवण्याची प्रक्रिया देखील सोपी केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT