Windows 11 मध्ये 6 वर्षानंतर नवे अपडेट, युजर्सला मिळणार 'खास' फीचर्स Saam Tv
देश विदेश

Windows 11 मध्ये 6 वर्षानंतर नवे अपडेट, युजर्सला मिळणार 'खास' फीचर्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्टने Microsoft आपले नवीन ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 लाँच केले आहे. या Windows 11 मध्ये कंपनीकडून अनेक नवे फीचर्स Features देण्यात आले आहेत. कंपनीने या ऑपरेटिंग सिस्टमला OS एकदम फ्रेश लुक दिला असून, नव्या थीम्स आणि ग्राफिक्सही चांगल्या प्रमाणात अपडेट केले आहेत. तसेच विंडोचा टास्कबार पूर्णपणे बदलला आहे. तर फाईल मॅनेजमेंटसाठीही काही नवे फीचर्स दिले आहेत. New update in Windows 11 after 6 years

Windows 11 असलेल्या मायक्रोसॉफ्ट मध्ये Start Menu हा वेगळा असेल. ज्यात आयकॉन्सही Icons दिले जाणार आहेत. या सोबतच रिकमेंडेड सेक्शनही ऍड करण्यात आलेले आहे. स्क्रीन वर रिसेंट फाईल्ससाठी विविध ऑप्शन दिलेले आहेत.

हे देखील पहा-

ब्लॉगद्वारे Microsoft ने दिलेल्या माहितीनुसार, हे ऑपरेटिंग सिस्टम या वर्षाअखेरीस कम्प्युटरमध्ये, लॅपटॉप मध्ये, तसेच टॅबलेट्समध्येही डिव्हाईसेसवर इन्स्टॉल केले जाईल. अद्याप याबाबतची तारीख सांगण्यात आलेली नाही. Dell, HP, Asus, Lenovo सारख्या OEM डिव्हाईससाठी Windows 11 रोल आउट झाल्यानंतर ते उपलब्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे Windows 10 प्रमाणे हेदेखील फ्री अपग्रेडसह उपलब्ध केलं जाईल.

काय आहेत Windows 11 फीचर्स -

पूर्णपणे रिडिझाईन करून हे Microsoft चे हे नेक्स्ट जनरेशन ऑपरेटिंग सिस्टम आणण्यात आले आहे. याच्या बदल म्हणजे बूट स्क्रिनपासून इंटरफेस आयकॉन्सपर्यंत पाहायला मिळणार आहेत. यात स्टार्ट मेन्यू सुद्धा सेंटरला देण्यात आला आहे. तर युजर्सकडून मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अॅप्स Apps एका क्लिकवर स्क्रोल करता येणार आहेत. सेंटरला टास्क बारला Task Bar अलाईन करण्यात आले आहे.

हे नवे येणारे ऑपरेटिंग सिस्टम टच फ्रेंडली Touch Friendly आहे. याला टॅबलेट्स आणि टच स्क्रिन PC च्या दृष्टीने याला डिझाईन करण्यात आलं आहे. तसेच यात डार्क आणि लाईट मोडही वापरण्यास मिळणार आहे.

Windows 11 मध्ये Gaming -

Microsoft ने आपल्या येणाऱ्या Windows 11 ला गेमिंग फ्रेंडली Gaming Friendly बनविण्यात आले आहे. यात ऑटो HDR फीचर देण्यात आले आहेत. ज्यामुळे गेमिंग आणखी जबरदस्त होऊ शकते. Xbox सीरीजने प्रेरित होऊन Windows 11 मध्ये कंसोल गेमिंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT