Stealth Omicron variant Saam Tv
देश विदेश

Omicron Variant: भारतात आढळला नवीन व्हेरिएंट; 4 मुलांसह 16 जणांना लागण (व्हिडीओ)

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) जगभरात हाहाकार माजवला असतानाच याच व्हायरसच्या आणखी एका व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) जगभरात हाहाकार माजवला असतानाच याच व्हायरसच्या आणखी एका व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. ओमिक्रॉनच्या या नवीन व्हेरिएंटला BA-2 असे नाव देण्यात आले आहे. ओमिक्रॉनचा हा सब व्हेरिएंट BA-2 मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमधील 16 रुग्णांमध्ये आढळून आला आहे. यात 4 लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या देशभरातून 530 नमुने चाचणीसाठी (Testing) पाठवण्यात आले आहेत. (Omicron Stealth Variant)

मिळालेल्या माहितीप्रमाणे यूके, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्कमध्ये देखील या नवीन व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन सारखा वेगाने पसरतो. अशा परिस्थितीत त्याचा संसर्ग (Spread) रोखणे हे मोठे आव्हान होणार आहे. चिंतेची बाब म्हणजे हा नवीन व्हेरिएंट ओळखण्यासाठी लागणारे चाचणी किटही मुभलक प्रमाणात उपलब्ध नाहीत असे सांगण्यात येत आहे. म्हणूनच याला 'स्टेल्थ' म्हणजेच (Stealth Omicron) हिडन व्हर्जन म्हटले जात आहे. तसेच ब्रिटन, स्वीडन आणि सिंगापूर या प्रत्येक देशांनी 100 हून अधिक नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत.

पहा व्हिडीओ-

BA-2 व्हेरिएंटचे लक्षण काय आहेत?

UKHSA (UK Health Security Agency) ने सांगितले की व्हायरल जीनोममधील बदल अद्याप निश्चितपणे सांगितले जाऊ शकत नाहीत, परंतु प्राथमिक मूल्यांकन असे सूचित करतात की मूळ ओमिक्रॉन BA.1 च्या तुलनेत स्टील्थ ओमिक्रॉन (BA.2) मध्ये वाढीचा दर आहे. UKHSA नुसार, स्टिल्थ ओमिक्रॉन आतापर्यंत 40 देशांमध्ये सापडला आहे. त्याचा सर्वाधिक प्रसार डेन्मार्कमध्ये होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT