Nepal Plane Crash Saam Tv
देश विदेश

Nepal Plane Crash : नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; ७२ प्रवाशांसह विमान कोसळलं, 30 ठार

नेपाळमध्ये मोठी विमान दुर्घटना

वृत्तसंस्था

Nepal Plane Crash News : नेपाळमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. या विमानात ७२ प्रवासी होते. पोखराजवळ हा अपघात झाला.

 अपघातग्रस्त विमान यती एअरलाईन्स असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्याला सुरुवात झाली. राजधानी काठमांडूहून विमान पोखराला जात होतं. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. अपघाताची माहिती मिळताच विमानतळ आणि विमान कंपन्यांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. नेपाळी लष्करासोबतच बचाव पथकही तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

अपघात झाल्यानंतर आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहे. यामुळे बचावकार्य करताना अनेक अडचणी येत असल्याचं दिसतेय. दुर्घटनाग्रस्त विमानात दहा विदेशी नागरिक प्रवास करत असल्याचं समोर आले आहे. यामध्ये पाच भारतीय होते. दरम्यान, बचावकार्य सुरू असल्याने विमानतळ बंद करण्यात आलं आहे. तसेच या परिसरात पोलिसांचा (Police) बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT