Sharad Pawar Saam Tv
देश विदेश

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवारच

राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियम येथे आज, शनिवारी पार पडले. या अधिवेशनात आज दिल्ली येथील विस्तारित राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत पार पडले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवारांनी उपस्थित सदस्यांना संबोधित केले. शरद पवारांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

'मला आश्चर्य वाटतं १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून संबोधित करताना महिला सन्मानाबाबच भाष्य केलं. एका बाजूला देशाचे पंतप्रधान महिला सन्मानाबाबत बोलतात. मात्र, पंतप्रधान ज्या राज्यातून येतात त्याच गुजरात राज्यातील सरकार बिल्कीस बानो या आमच्या बहिणीवर अत्याचार करण्यात आले. तसेच बानो यांच्या कुटुंबावर देखील अत्याचाराला सामोरे जावं लागलं. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केली गेली. त्याच दोषींना सोडण्याचे काम गुजरात सरकारने केले, असे म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Griha Lakshmi Yojana: महिलांना दर महिन्याला मिळणार ₹२०००; गृह लक्ष्मी योजनेसाठी अर्ज कसा कराल?

Maharashtra Live News Update: पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन

Pune : पुण्यातील भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; भाजप कार्यकर्त्याला अटक; नेमकं काय आहे कनेक्शन? वाचा

Aadhaar Address Update: आधार कार्डावरचा पत्ता कसा बदलायचा? किती शुल्क लागणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Viral Video: लग्नमंडपात राडा, जेवणाच्या पंक्तीला बसताच वऱ्हाडी मंडळीनी एकमेंकावर फेकल्या खुर्च्या, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT