Sharad Pawar Saam TV
देश विदेश

Sharad Pawar : शरद पवारांकडून भर बैठकीत नाराजी व्यक्त, नेमकं काय आहे कारण?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजाबद्दल ही नाराजी व्यक्त केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजाबद्दल ही नाराजी व्यक्त केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Maharashtra Political News)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजकीय हस्तक्षेप करतात, तसेच ते राजकीय हेतूने देखील काम करतात, असा आरोप शरद पवार यांनी केल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांच्या भूमिकेबद्दल सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, द्रमुक नेते टीआर बाबू, टीएमसी नेते सुदीप बंदोपाध्याय आणि सुखेंदू शेखर रे, बीआरएसचे केशवा राव आणि नामा नागेश्वर राव यांच्यासह विजयसाई रेड्डी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.  (Latest Marathi News)

याशिवाय बैठकीला वायएसआर काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या गटातील नेत्यांची सुद्धा उपस्थिती असल्याची माहिती आहे. बैठकीला ३७ सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. याच बैठकीत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजावरुन नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

How to Peel Garlic: आता काही सेकंदात सोलून होईल लसूण; फक्त फॉलो करा या 3 टीप्स

Skin Cancer : नेलपेंट आणि मॅनिक्युरमुळे त्वचेचा कॅन्सर, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

Nanded : कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या; साम टीव्हीच्या बातमीनंतर फायनान्स कंपनीला टाळं

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT