Nawab Malik Saam tv
देश विदेश

Nawab Malik : नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; जामीन कायम ठेवला, ईडीनेही विरोध नाही केला

Nawab Malik Update: नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन कायम ठेवला आहे. ईडीनेही विरोध केला नाही.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांचा मेडिकल जामीन कोर्टाने कायम केला आहे. मलिक जोपर्यंत आजारी आहेत, तोपर्यंत त्यांना तुरुंगाबाहेर येता येणार आहे. मलिक यांच्या जामिनाही ईडीने विरोध केला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात होते. या प्रकरणात नवाब मलिक यांना जामीन मिळाला असून सध्या तुरुंगाबाहेर आहे. नवाब मलिक यांना मेडिकल जामीन मिळाला आहे. नवाब मलिक यांचा हाच मेडिकल जामीन कायम ठेवला आहे. त्यामुळे नबाव मलिक आजारी असेपर्यंत तुरुंगाबाहेर राहणार आहे. मलिक यांच्या जामिनाला ईडीने देखील विरोध केलेला नाही.

कथित गोवावाला कंपाऊंड प्रकरणात नवाब मलिक यांना २०२२ साली ईडीकडून अटक करण्यात आली होती. पुढे २०२३ साली आरोग्याच्या कारणामुळे जामिनावर बाहेर आले होते. जामिनावर बाहेर आलेले नवाब मलिक यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीलाही हजेरी लावली होती. त्यांनी मतदानाचा हक्काही बजावला होता. या मतदानाच्या आधी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली होती. a

काय आहे प्रकरण?

कुर्ल्यातील गोवावा कंपाऊड येथील जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या जमिनीसाठ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीशी व्यवहार केल्याचाही आरोप आहे. याच कारणावरून फेब्रुवारी २०२२ मध्ये ईडीने अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Draping Style: लग्नसराईत सहावारी साडीला द्या हटके लूक; पाहा या साडी नेसण्याच्या ७ स्टायलिश पद्धती

बदलापुरात राजकीय वाद टोकाला; शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण

Homemade BB Cream: 5 मिनिटांत घरच्याघरी बनवा नॅचरल बीबी क्रिम, काचेसारखा चमकेल चेहरा, पैशांचीही होईल बचत

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा जळगाव-पुण्यातील ताजे दर

Pune : तू रोगीट..." पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, नवऱ्याच्या आणि सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT