Viral Video Saam Tv
देश विदेश

Viral Video: शानदार, जबरदस्त! मेट्रोमध्ये दुर्गा मातेची स्थापना? व्हायरल VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Kolkata Viral Video: सोशल मीडियावर सध्या नवरात्री उत्सावाचे अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळत आहे. सध्या या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात नक्की काय आहे ते पाहा व्हिडिओत.

Tanvi Pol

Navratri Special: सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यात नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. प्रत्येक भागानुसार नवरात्री उत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदलत जातात. सध्या बदलत्या काळानुसार कोणताही सण साजरा करताना अनेक सजावटीच्या पद्धती बदलत जात आहेत. अतिशय आकर्षक देखावे पाहण्यास मिळतात. सध्या अशाच एका देखाव्याच्या व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो देखावा आपल्याला मेट्रोचे अभावी रुप भासवतो.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला मेट्रो दिसून येत आहे. व्हिडिओ जस जसा पुढे जात आहे. तस तसा तुम्हाला मेट्रोतील आतील भाग दिसून येत आहे. सर्व व्हिडिओ तिथे असलेला एक व्यक्ती कॅमेऱ्यात कैद करत आहे. व्हिडिओत संपूर्ण मेट्रो खाली दिसून येत आहे. मात्र व्हिडिओ पाहून तुम्हाला मेट्रो अतिशल लांब दिसून येईल मात्र व्हिडिओ (Video)जसा पुढे जाईल तसा अनेक व्यक्ती दिसून येत आहेत. परंतू व्हिडिओच्या अतिशय शेवटी तुम्हाला दुर्गा देवीची मोठी प्रतिमा दिसून येईल. तिथे जमलेले सर्व नागरिक देवीच्या पाया पडताना दिसत आहे तर काहीजण कॅमेऱ्यात संपूर्ण देखावा कैद करताना दिसून येत आहेत. मात्र शेवटी तुम्हाला समजेल ती मेट्रो नसून एक दुर्गा देवी मंडळाचा देखावा आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो एक्स प्लॅटफॉर्मवरील ''@abirghoshal'' .या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. ७ ऑगस्ट रोजी व्हिडिओ पोस्ट केला असून आता पर्यंत व्हिडिओला तब्बल १६ लाखहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.

एक्सवरील या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करत,''माझ्यावर विश्वास ठेवा हे कोलकात्यातील पूजा पंडाल आहे'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. मंडळाचा अद्भुत देखावा पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे मला आधी खरंच ती मेट्रो वाटली'' तर दुसऱ्या एका यजूरने लिहिले आहे की,''खरंच हे खूप भारी आहे'' अशा पद्धतीने सर्व यूजर्संनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT