Salary Increment SAAM TV
देश विदेश

Layoffs Survey : नोकरदारांसाठी Good News! यावर्षी इतकी पगारवाढ मिळणार, पण एक भीती आहेच!

Salary Increment: पहिल्या सहामाहीत नोकर कपातीत घट होण्याची शक्यता आहे. तर यावर्षी सरासरी वेतनवृद्धी २० टक्क्यांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

साम टीव्ही ब्युरो

Salary Increment: जागतिक मंदीच्या शक्यतेनं नोकरदार वर्गावर कपातीची टांगती तलवार असतानाच एक आनंदवार्ता आली आहे. पहिल्या सहामाहीत नोकर कपातीत घट होण्याची शक्यता आहे. तर यावर्षी सरासरी वेतनवृद्धी २० टक्क्यांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

जॉब पोर्टल नोकरी डॉट कॉमच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, कंपन्यांच्या (Company) म्हणण्यानुसार सन २०२३ च्या पहिल्या सहामाहीत नोकरकपातीचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे आयटी क्षेत्राशी (IT Sector) संबंधित नोकऱ्या आणि वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेल्यांना कपातीचा झटका बसण्याची भीती आहे. (Jobs News)

नवी नोकरभरतीसंदर्भात (Job) कंपन्यांचा दृष्टिकोन बदलल्याने यावर्षी सरासरी वेतनवृद्धी २० टक्क्यांहून अधिक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नोकरी डॉट कॉमच्या वतीनं जवळपास १४०० कंपन्यांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेक्षण अहवालानुसार, केवळ चार टक्के कंपन्यांनीच या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नोकरकपातीची शक्यता व्यक्त केली आहे. तर दहा क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये केलेल्या सर्व्हेनुसार, आयटी क्षेत्रात पुढील काही महिन्यांत नोकरकपात होण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेल्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज जवळपास २० टक्के कंपन्यांतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक असेल, अशी शक्यता अर्ध्याहून अधिक कंपन्यांनी व्यक्त केली आहे. यातील सर्वाधिक कर्मचारी हे आयटी क्षेत्रातील असू शकतात.

नोकरीच्या संधी वाढणार

जवळपास ५० टक्के कंपन्यांनी नवीन नोकरभरती आणि जुन्या पदांवर नियुक्त्यांची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर २९ टक्के कंपन्यांनी केवळ नवीन भरती करण्याबाबत सांगितले आहे. तर कर्मचाऱ्यांची संख्या कायम ठेवण्यात येणार असल्याचे १७ टक्के कंपन्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT