Swati Maliwal Assault Case ANI
देश विदेश

Swati Maliwal Assault Case: महिला आयोगाच्या समन्सनंतर स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणाच्या तपासाला वेग

Swati Maliwal Assault Case: दिल्लीचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. बिभव कुमार यांच्यावर मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय.

Bharat Jadhav

नवी दिल्ली : आपच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी प्रमुख स्वाती मालीवाल यांच्या मारहाण प्रकरणाने जोर पकडलाय. राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीएस विभव कुमार यांना समन्स बजावले आहे. आयोगाच्या चौकशीसाठी उद्या म्हणजेच शुक्रवारी हजर राहावे, असं महिला आयोगानं म्हटलंय. याचदरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी मालीवाल यांच्या घरी पोहोचलेत.

मालीवाल यांच्या मारहाण प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाला नोटीस पाठवलीय. या नोटीसनुसार, त्यांनी सोशल मीडिया पोस्टची स्वतःहून दखल घेतलीय. केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचं म्हटलंय.

आयोगाने १७ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी घेण्यात येणार असल्याचं म्हटलंय. या सुनावणीसाठी बिभव कुमार यांना हजर राहावे लागणार आहे. जर आयोगासमोर हजर न झाल्यास बिभव कुमार यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असं न्यायालयाने म्हटलंय.

दरम्यान मालीवाल यांना मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर डीसीडब्ल्यूचे प्रमुखांनी सार्वजनिक अशी प्रतिक्रिया दिली नाहीये. मंगळवारी पोलीस कर्मचारी मिंटो रोडवर स्थित असलेल्या निवासस्थानी गेले होते. दरम्यान मालीवाल यांनी अद्याप तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधलेला नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. मात्र काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी स्वाती मालीवाल यांच्या पथकासह त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Meditation Benefits: सकाळी 5 मिनिटे ध्यान केल्याने शरीर आणि मनावर काय परिणाम होतो?

Shocking : भीषण अग्नितांडव! दोन शाळा जळून खाक, २९ जणांचा मृत्यू

मोठी बातमी: सणासुदीत महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? परवानगी कशी घ्याल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

SCROLL FOR NEXT