PM Narendra Modi  Saam Tv
देश विदेश

Teleprompter बंद हाेताच PM माेदी गाेंधळात; काॅंग्रेसचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था’, म्हणत काँग्रेसचा मोदींवर निशाणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (१७ जानेवारी) रात्री वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. पंतप्रधान मोदींनीया भाषणामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले. प्रचाराची सभा असो, उद्घाटनाचा कार्यक्रम असो किंवा आंतरराष्ट्रीय परिषद, बैठक यामध्ये मोदींच्या भाषणाची चर्चा नेहमीच होत असते. आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी या भाषणामधूनही छाप पाडून गेले. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या भाषणावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण थांबवावं लागलं आणि त्यांचा काही क्षण गोंधळही उडाला. (PM Narendra Modi PM teleprompter Latest News)

हे देखील पहा -

भारतीयांनी कोरोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असं मोदी म्हणाले. मात्र यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. त्यानंतर ते थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. त्यानंतर हात वर करत कानात हेडफोन लावत समोर असलेल्यांना ऐकू येतंय ना असा प्रश्न विचारु लागले. त्यानंतर टेलिप्रॉम्प्टर पुन्हा सुरु झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा भाषण पहिल्यापासून सुरु केलं.

या साऱ्या प्रकारानंतर सोशल मीडियावरुन टीका होऊ लागली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही ‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।’, म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे. #TeleprompterPM हा हॅशटॅग देखील काँग्रेसने ट्विट करताना वापरला आहे. तसेच या प्रकरणावर काॅंग्रेस नेते राहून गांधी यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र माेदींवर टीका केली आहे. इतकं खाेटं Teleprompter ला पण सहन नाही झालं अशी टीका त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT