अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात दाजी आंधळा; लग्न करण्यासाठी मित्रांच्या साह्याने बायकोची केली हत्या SaamTV
देश विदेश

अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात दाजी आंधळा; लग्न करण्यासाठी मित्रांच्या साह्याने बायकोची केली हत्या

आरोपी प्रेमात एवढा आंधळा झाला की त्याने चक्क मेहुणीशी लग्न करायचं ठरवलं. मात्र या लग्नासाठी बायको अडथळा ठरत असल्याने त्याने बायकोला मारण्याचा निर्णय घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झारखंड : आपल्या मेहुणीच्या प्रेमात आंधळ होवून दाजीने आपल्या बायकोची हत्या (Murder of Wife) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरची घटना झारखंडमधील धनबादच्या बलियापूर पोलीस स्टेशन (Police Station) परिसरातील घडली असून आरोपी उत्तम डे याला पोलिसांनी आरोपीला हत्या करताना वापरलेल्या शस्त्रासह अटक केली आहे.

हे देखील पहा -

मेहुणीच्या प्रेमासाठी बायको प्रतिमा देवीचा गळा चिरून नराधन पतीने हत्या केली आहे. आरोप उत्तम डे हा त्याची बायको प्रतिमासोबत राहत होता त्याच वेळी त्याचे आपल्या बायकोच्या लहान बहिणीच्या प्रेमात पडला. आणि तो प्रेमात एवढा आंधळा झाला की त्याने चक्क मेहुणीशी लग्न करायचे ठरवलं. मात्र या लग्नासाठी त्याची बायको अडथळा ठरत असल्याने आरोपीने आपल्या पत्नीला मारण्याचा निर्णय घेतला.

आरोपी उत्तम डे याने आपल्या काही मित्रांसोबत बायकोला मारण्याचा प्लॅन ठरवला, आरोपी बायको प्रतिमादेवीला रस्त्याने चालत घेऊन जात असताना आरोपीचा मित्र विकास रायने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने कार थांबवली आणि मुन्ना याने प्रतिमाचे तोंड हाताने दाबून गळा चिरून हत्या केली. मात्र आरोपी आणि त्याचे मित्र एवढ्यावरतीच न थांबता त्यांनी प्रतिमा वरती चाकूने सपासप वार करुन तिला जंगलात फेकून देवून हे सर्व गुन्हेगार पळून गेले. दरम्यान 3 नोव्हेंबर रोजी पीडित महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना सर्व घटनेचा उलगडा झाला. आणि आरोपी उत्तम डेने आपला गुन्हा कबुल केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: अर्शदीपला माफी मागायची गरज नव्हती, फायनलमधील झालेल्या राड्यावर गौतम स्पष्टच बोलला

Monalisa Wedding: कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने पळून जाऊन केलं लग्न, कोण आहे तिचा नवरा? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT