Crime : हत्तीच्या नावावर 5 कोटींची संपत्ती करणाऱ्या 'त्या' इमामाची हत्या SaamTV
देश विदेश

Crime : हत्तीच्या नावावर 5 कोटींची संपत्ती करणाऱ्या 'त्या' इमामाची हत्या

हत्तींचा सरदार अशी ओळख असलेल्या आणि आपल्या हत्तींच्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती करणाऱ्या ईमाम यांची बुधवारी हत्या करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाटणा : हत्तीच्या Elephant सरदार अशी ओळख असलेल्या आणि आपल्या हत्तींच्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती करणाऱ्या अख्तर ईमाम यांची बुधवारी हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे.

अक्तर इमाम (Akhtar Imam) यांच्यावरती हल्लेखोरांनी 8 गोळ्या झाडल्या. ईमाम यांच्या हत्येची घटना समजताच संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी कौटुंबिक जमिनीच्या वादातून अख्तर इमाम यांची झाली असल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

हत्तींच्या नावावर 5 कोटींची संपत्ती

अख्तर इमाम यांना बिहारमधील हत्तींचा सरदार म्हणून ओळखलं जायच. इमाम यांनी आपल्या हत्तींच्या नावावर जवळपास 5 कोटींची संपत्ती केल्यामुळे ते चर्चेत आले होते.

बुधवारी हत्तींच्या शेडमध्ये काम करत असताना अचानक अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यांच्यावरती 8 गोळ्या झाडल्या. ईमाम यांच्यावरती हा गोळीबार झाल्यावरती तेथील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासलं असता मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. अख्तर यांच्या हत्येप्रकरणी आम्ही तपास करत असल्याचं फुलवारीशरीफचे SP मनीष कुमार यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT