Mumbai High Court Saam TV
देश विदेश

Mumbai High Court : १० टक्के पीडितांना विनामुल्य न्याय मिळवून द्या; न्यायमूर्ती रेवती मोहिते - डेरे यांचे वकिलांना आवाहन

रविवारी राजगुरुनगर येथे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या विस्तार इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai High Court : न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा वकील-न्यायाधीश यांच्या माध्यमातून निवाडा लवकरात लवकर कसा करता येईल याबद्दल प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते - डेरे यांनी व्यक्त केले आहे. राजगुरूनगर येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

रविवारी राजगुरुनगर (rajgurunagar) येथे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या विस्तार इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी न्यायाधीश आणि वकील (Lawyer) मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांवर न्यायालयात खटले सुरू आहेत. वर्षांनुवर्षे हे खटले सुरू असल्याने अनेक नागरिक मेटाकूटीला आलेत. काही व्यक्तींना पैशांची चणचण भासत असल्याने त्यांनी कोर्टातील वाऱ्या बंद केल्या आहेत. तर अनेकांनी केस बंद न करताच विषय सोडून दिला आहे.

यामुळे उद्घाटन सोहळ्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते - डेरे यांनी उपस्थित वकील आणि न्यायाधीशांना त्यांचे कर्तव्य सांगत काही सूचना केल्या आहेत. पीडितांना न्याय मिळवून देणे हे वकीलांचे कर्तव्य आहे. वकील-न्यायाधीश यांच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणाचा निवाडा लवकरात लवकर कसा करता येईल याबद्दल प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

समाजातील १० टक्के नागरिकांचे विना मोबदला काम करण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून द्या असे आवाहन मोहिते-डेरे यांनी केले. प्रत्यक्षात न्यायाधीश आणि वकिलांनी असे केल्यास बहुसंख्य पीडितांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात पुन्हा पाणी गळती सुरू

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT