Mumbai-Delhi Expressway Freepik
देश विदेश

Mumbai-Delhi Expressway : मुंबईतून दिल्ली गाठा अवघ्या १२ तासात, नवा एक्स्प्रेसवे लवकरच लोकांच्या सेवेत, काम कुठपर्यंत आलंय?

New Expressway : मुंबई-दिल्ली प्रवास करण्यासाठी २४ तास लागतात. नव्या एक्स्प्रेसवेमुळे हा प्रवास फक्त १२ तासांमध्ये करता येणार आहे. हा एक्स्प्रेसवे कधीपर्यंत खुला होईल ते जाणून घ्या.

Yash Shirke

Mumbai-Delhi Expressway: प्रवासाचा वेळ आणि प्रवाश्यांचे पैसे वाचावे यासाठी सरकारने देशातील एक्स्प्रेसवे बांधले आहेत. नव्या वर्षामध्ये भारतातील काही खास एक्स्प्रेसवे खुले केले जाणार आहेत. या महामार्गांमध्ये मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवे आणि दिल्ली-देहरादून एक्स्प्रेसवेचा या दोन महामार्गांचा समावेश आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवे हा काही अंशी खुला करण्यात आला असून वर्षअखेरीस तो पूर्णपणे खुला केला जाणार आहे. १३५० किमी लांब महामार्ग भारतमाला प्रकल्पाच्या अंतर्गत येतो.

सध्या मुंबई-दिल्ली बाय-रोड प्रवास करण्यासाठी तब्बल २४ तास लागतात. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवे खुला झाल्याने हा प्रवास फक्त १२ ते १३ तासांमध्ये करणे शक्य होणार आहे. म्हणजेच महामार्गाच्या वापरामुळे लोकांचे प्रवासातले १२ तास वाचणार आहेत. हा एक्स्प्रेसवे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या पाच राज्यांमधून जाईल. या प्रकल्पातील ६३० किमी मार्गावर वाहतुक सुरु आहे.

२६४ किमी लांब दिल्ली-देहरादून एक्स्प्रेसवे बांधून पूर्ण झाला आहे. उद्घाटन झाल्यानंतर हा महामार्ग प्रवासासाठी खुला केला जाईल. या एक्स्प्रेसवेमुळे दिल्ली ते देहरादून हा प्रवास फक्त अडीच तासांमध्ये होईल. या महामार्गाला एक रस्ता बांधला जाणार आहे, जो पुढे जाऊन देहरादूनला हरिद्वारशी जोडेल. या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे या एक्स्प्रेसवेमध्ये आशिया खंडातील सर्वात लांब उंच वन्यजीव संवर्धक कॉरिडोर बांधले जाणार आहे. याची लांबी १२ किमी असणार आहे. दिल्ली-देहरादून प्रवास करताना सफारीचा आनंद घेणे शक्य होईल.

खुल्या होणाऱ्या दोन्ही एक्स्प्रेसवेमुळे प्रवास सुकर होणार आहे. एक्स्प्रेसवेवर वाहनांचा वेग ताशी १०० किमी असेल. त्यामुळे प्रवाश्यांना कमी वेळेमध्ये प्रवास करता येईल. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई ही दोन महानगरे नव्या महामार्गाने जोडले गेल्याने सर्वप्रकारे फायदा होईल असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT