Lokayukta police team arrested a patwari in Sidhi district of Madhya Pradesh while accepting a ₹5,000 bribe token in a corruption trap AI
देश विदेश

५० हजारांची डील, ५ हजाराचे टोकन घेताना तलाठी रंगेहाथ सापडला

₹5000 Token Bribe Trap By Lokayukta Police: मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यात लोकायुक्त पोलिसांनी मोठी कारवाई करत तलाठीला लाच घेताना रंगेहात पकडले. वारसा हक्क आणि नामांतरणाच्या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून ५ हजार रुपये घेताना सापळा रचून अटक करण्यात आली.

Omkar Sonawane

देशाला भ्रष्टाचाराच्या किडयांनी किती पोखरले आहे याची प्रचिती रोज घडणाऱ्या घटनांमधून येत असते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अनेक अधिकारी अडकत असल्याचे वारंवार समोर येत असताना मध्यप्रदेशमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यातील गोपद बनास तहसीलमध्ये कार्यरत असलेल्या तलाठी मुनेन्द्र सिंह भदौरिया याला लोकायुक्त पोलिसांनी लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदाराकडून वारसाना आणि नामांतरणाच्या कामासाठी त्याने तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी २५ हजार रुपये आधीच घेतले होते, तर उर्वरित रकमेतील ५ हजार रुपये घेताना लोकायुक्तांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

या प्रकारणाबाबत तक्रारदार मुनेश्वर प्रसाद सोनी म्हणाले, माझ्या आईच्या मृत्यूनंतर वारसा हक्क आणि नाव बदलण्याचे काम करायचे होते. दोन्ही प्रकरणाचे तलाठीने 50 हजारांची लाच मागितली होती. ज्यामध्ये आता पर्यंत 25 हजार घेतले गेले होते, आणि आज 5 हजार घेत असताना लोकायुक्त पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुनेश्वर प्रसाद सोनी यांनी सांगितले की, लाचेची रक्कम घेतल्यानंतरही तलाठी त्यांना सतत त्रास देत होता आणि अधिक पैशांची मागणी करत होता. २५ हजार रुपये घेतल्यानंतर उर्वरित २५ हजार रुपये मागितले जात होते, ज्याची तक्रार मी लोकायुक्त पोलिस रेवा येथे केली आणि रेवा लोकायुक्तचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण सिंह परिहार यांनी आज तलाठीच्या घरातून ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CNG आणि PNG च्या दरांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या ताजे दर

Bus Accident : पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Pravin Tarde : 'देऊळ बंद २'च्या धामधूमीत प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; चाहत्यांना दिलं भन्नाट सरप्राइज, वाचा नेमकं काय म्हणालं?

Manoj Jarange : पुन्हा आंदोलनाची ठिणगी!रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील करणार आमरण उपोषण; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT