Nishikant Dubey Statement On PM Modi 
देश विदेश

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Nishikant Dubey Statement On PM Modi: पंतप्रधान मोदी भाजपची मजबुरी आहे, असं खळबळजनक वक्तव्य भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केलंय. मात्र मोदी भाजपला मजबुरी का वाटत आहेत. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट.

Girish Nikam

काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवतांनी निवृत्तीच्या मुद्द्यावर चर्चा छेडलीय. अंगावर पंचाहत्तरीची शाल पडली की, थांबलं पाहिजे, असं म्हणत मोहन भागवतांनी अप्रत्यक्षपणे थेट मोदींच्या निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा रंगलीय. त्यावरुन विरोधकांनीही मोदींवर निशाणा साधला होता. आता झारखंडमधील भाजपचे ज्येष्ठ खासदार निशिकांत दुबेंच्या मोदींबाबतच्या एका वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. मोदींच्या नेतृत्वाशिवाय भाजप १५० जागाही जिंकू शकणार नाही, असं दुबे म्हणालेत. तर काँग्रेसने यावरुन मोदींना टोला लगावलाय.

दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दुबे म्हणतायेत म्हणजे त्यात तथ्य असेल असं म्हणत भाजपला चिमटा काढलाय. मराठी-अमराठी वादात दुबेंनी उडी घेत मराठींना आपटून आपटून मारणार,असं वादग्रस्त विधान करत मराठी माणसाला डिवचलं होतं. त्याला राज ठाकरेंनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे दुबे चर्चेत आहेत. मात्र मोदींशिवाय भाजपला पर्याय नाही, असं म्हणणाऱ्या निशिकांत दुबेने अप्रत्यक्षरित्या मोदींच्या निवृत्तीकडे बोट दाखवणाऱ्या संघालाच आव्हान दिलंय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर रेल्वे स्टेशनवर माफियांचे आणि कुख्यात हिस्ट्रीशीटरचे वर्चस्व, शिवसेनेचा गंभीर आरोप

Local Body Election : जालन्याचा पहिला महापौर कोण? भाजप अन् शिंदेसेनाचा थेटच सामना; वाचा गोरंट्याल की खोतकर, कुणाचं पारडं जड

Rakhi Sawant: राखी सावंत आणि आदिल दुर्राणीचं पॅचअप; अभिनेत्रीने केस घेतली मागे, न्यायालयाने केला FIR रद्द

Malegaon : मालेगावात एमडी ड्रग्स तस्करी उघड; किल्ला पोलिसांनी कारवाई करत तिघांना घेतले ताब्यात

Crime : धावत्या स्कूल बसमध्ये दहावीच्या मुलीचा विनयभंग, ड्रायव्हरचं लाजिरवाणे कृत्य, नगरकरांचा संताप अनावर

SCROLL FOR NEXT