Amol Kolhe, Chhatrapati Shivaji Maharaj saam tv
देश विदेश

Loksabha : शिवरायांविषयी बाेलताना एनसीपी खासदाराचा माईक केला बंद; 'शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवतील'

संसदेत कायदा करुन महापुरुषांना संरक्षण देण्यात यावा अशी मागणी केली जात हाेती.

रोहिदास गाडगे

Amol Kolhe : छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रात काही नेत्यांकडून वारंवार वेगवेगळी वक्तव्य करुन अवमान केला जात आहे. त्याचे पडसाद राज्यासह देशात उमटत आहेत. बुधवारी महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत त्यांच्या भावना मांडल्या. आज खासदार अमाेल काेल्हे (amol kolhe) यांनी संसदेत शू्न्य प्रहारात त्यांची भावना मांडत असताना माईक बंद करण्यात आला. या प्रकाराचा निषेध समाज माध्यमातून व्यक्त केला जात आहे. खासदार काेल्हे यांनी देखील त्यांची भुमिका समाज माध्यमातून मांडली.

खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले राज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करुन अवमान केला जातोय. त्यामुळे याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी संसदेत कायदा करुन महापुरुषांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यासाठी शून्य प्रहरात भावना व्यक्त करीत हाेता. परंतु काही काळानंतर माईक बंद करण्यात आला.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही. ताे तमाम शिवभक्तांचा आवाज कानठाळ्या बसविल्याशिवाय रहाणार नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मुंबई महापालिकेतही राजकीय भूकंप, ठाकरेसेनेचे विरोधीपक्षनेते पद जाणार?

Pune Crime: बिल्डर अग्रवाल यांच्या मुलाच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सिया आणि चेतननं 14 जूनलाच आखला होता कट

कोट्यवधींची ऑफर फेटाळली, मंत्रिपदही नाकारलं; ठाकरेंच्या निष्ठावंत खासदाराचा होणार भव्य नागरी सत्कार

Foot Care In Monsoon : पावसाचे घाणेरडे पाणी पायांसाठी धोकादायक, उद्भवेल 'ही' गंभीर समस्या

Maharashtra News Live Update:परळीच्या चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता

SCROLL FOR NEXT