Milk Price Hike Saam Tv
देश विदेश

Milk Price Hike: आता या डेअरीनेही लावली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; जाणून घ्या नवे दर

वाढलेल्या किंमती रविवार पासून लागू होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अमूल, पराग या डेअरींनी दरवाढ केली.

साम वृत्तसंथा

Milk Price Hike: अगोदरचं कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यात वाढलेल्या इंधन दरांमुळे महागाई वाढली आहे. आता पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दुधाच्या दरात पुन्हा डेअऱ्यांनी दरवाढ केली आहे. काही दिवसांपूर्वीच अमूल,(Amul) पराग या डेअरींनी दरवाढ केली होती. आता मदर डेअरीनेही दुधाचे (Milk) दर वाढवले आहेत.

आता मदर डेअरीचे (Mother Dairy) दूध खरेदी करण्यासाठी ग्राहकांना वाढीव किंमत मोजावी लागणार आहे. मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ केली. ही वाढलेली किंमत रविवारपासून लागू होणार आहे. खर्चात वाढ झाल्याने दुधाचे (milk) दर वाढवले ​​जात असल्याचे मदर डेअरीने सांगितले.

दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरीच्या (Mother Dairy) एक लिटर दुधाची किंमत 46 झाली आहे. ती यापूर्वी 44 रुपये होती. तर फुल क्रीम दुधाची किमत 57 वरुन 59 रुपये झाली आहे. टन्ड दूध 47 रुपयांवरुन 49 रुपये, डबल टोन्ड दूध 41 वरुन 43 रुपये आणि गायीच्या दुधाची किंमत 49 रुपयांवरुन 51 झाली आहे. सुपर-टी दुधाचा अर्धा लिटरचा भाव 26 रुपयांवरून 27 रुपयांपर्यंत वाढला आहे.

अमूल मिल्क (Amul milk) प्राइसेस आणि पराग मिल्क फूड्सने दर वाढवल्यानंतर काही दिवसांनी मदर डेअरीने हा निर्णय घेतला आहे. अमूल (Amul) आणि पराग मिल्क फूड्सनेही दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली होती.काही दिवसांपूर्वी गोवर्धन गोल्ड मिल्कचा दर आता ४८ रुपयांवरून ५० रुपये झाला आहे. तर टोन्ड दुधाचे भाव ४६ रुपयांवरून ४८ रुपयांवर पोहोचला.

अमूल आणि गोवर्धन डेअरीनेही वाढवले दर

अमूल (Amul) आणि गोवर्धन डेअरीने एक मार्च पासून दुधाचे दर वाढवले आहेत. एफएमसीजी डेअरी कंपनी पराग मिल्क फूड्स लिमिटेडने गोवर्धन ब्रँडच्या गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. या वाढीनंतर गोवर्धन गोल्ड मिल्कचा दर 48 रुपयांवरून 50 रुपयांवर पोहोचला आहे.

Edited by- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT