Beed Crime News Saam tv
देश विदेश

UP Crime News : महिलेसोबत अनैतिक संबंध, मुलीवरही ठेवायचा वाईट नजर; माय-लेकींकडून प्रियकराची हत्या

Crime News : पोलिसांनी आई आणि मुलीला अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमधील रायबरेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने मुलीच्या मदतीने प्रियकाराची हत्याची केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आई-मुलीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मृत व्यक्ती महिलेच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे माय-लेकींनी टोकाचं पाऊल उचललं आहे.

एका पुरुषाचे त्याच्याच गावातील एका महिलेसोबत प्रेम जडलं होतं. दरम्यान दोघेही एकत्र राहू लागले होते. काही दिवसांनी महिलेच्या तरुण मुलीवर पुरुषाची वाईट नजर गेली. हा प्रकार महिलेला समजताच तिने मुलीच्या मदतीने व्यक्तील संपवण्याच कट रचला.

21 ऑगस्ट रोजी गावापासून काही अंतरावर मेंडीलाल (वय 50) याचा मृतदेह जंगलात सापडला होता. मृताचा मुलगा सुनील कुमार याच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. मृत मेंडीलालचे गावात राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Crime News)

मेंडीलाल दारूच्या नशेत आपली महिलेच्या 19 वर्षीय मुलीचा विनयभंग करत असे. महिलेने याबाबत मेंडीलालला अनेकदा समजावले होते. मात्र अखेर मेंडीलालच्या कृत्याला कंटाळून आई-मुलीने मेंडीलालला घराच्या बोलावून काठीने बेदम मारहाण करून गळा आवळून खून केला.  (Latest Marathi News)

खून केल्यानंतर आई-मुलीने मृतदेह चादरीने गुंडाळून घरापासून 100 मीटर अंतरावर फेकून दिला. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. अवघ्या 48 तासांत या हत्येचा उलगडा करत पोलिसांनी आई आणि मुलगी दोघांना अटक केली. पोलिसांनी हत्येत वापरलेली काठी, ओढणी आणि चादरही जप्त केली आहे. पोलिसांनी आई आणि मुलीला अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT