Most Expansive Vehicle Number Saam Tv
देश विदेश

चक्क ७२ कोटींना विकली ३ अंकी नंबरप्लेट, कुठे झाला लिलाव?

भारतीय चलनानुसार या नंबरची किंमत ७२ कोटींपेक्षा जास्त आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : आपल्याकडे महागडी गाडी असावी असं प्रत्येकाला वाटतं. काहींना तर महागड्या गाड्या खरेदी करण्याचा छंदही असतो. तर काहींना मात्र दुर्मिळ आणि जुन्या बाईक किंवा गाड्या खरेदी करण्याची आवड असते. यासोबतच काहीजण गाड्यांचे विशेष नंबरही खरेदी करतात. त्यासाठी ते वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. अलीकडेच, दुबईमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे एका व्यक्तीने AA८ क्रमांकाच्या नंबरप्लेटसाठी ३५ दशलक्ष दिरहम खर्च केले आहे.(Most Expansive Vehicle Number Plate Sells For 72 Crore Rupees In Dubai)

भारतीय चलनानुसार या नंबरची किंमत ७२ कोटींपेक्षा जास्त आहे. एका हिंदी वृत्तसंस्थेनुसार जगातील कुठल्याही लिलावात खरेदी केलेली ही सर्वात महागडी नंबर प्लेट आहे. दुबईमध्ये या नंबरप्लेटचा लिलाव झाला. या नंबरला खरेदी करण्यासाठी अनेकांनी बोली लावली होती. त्यामुळे लिलावाच्या शेवटी या नंबरप्लेटची बोली ७२.०८ कोटीपर्यंत पोहचली. तसं पाहता या लिलावात AA८ हा एकमेव नंबर नव्हता, याशिवाय F५५, V६६ आणि Y६६ यासारख्या नंबरचा देखील समावेश होता. या नंबरची बोली सुद्धा कोटीच्या घरात गेली आहे.

AA८ या नंबरप्लेट व्यतिरिक्त, जगातील सर्वात महागड्या नंबर प्लेटचा विक्रम कॅलिफोर्नियाच्या MM नंबर प्लेटच्या नावावर आहे. या नंबर प्लेटची किंमत NFT म्हणजेच नॉन फंजिबल टोकनमध्ये २४.५ मिलियन इतकी आहे, जी भारतीय चलनात सुमारे १ अब्ज ८८ कोटी रुपये आहे. मात्र, आजवर हा नंबर खरेदी करण्यासाठी कंपनीला खरीददार मिळालेला नाही.

केवळ परदेशातच नाही तर भारतातही युनिक नंबरला मोठी मागणी आहे. भारतातील अनेक ग्राहक मोठी बोली लावत अशा प्रकारच्या युनिक नंबरची खरेदी करतात. अलीकडेच, चंदीगड येथील एका ४२ वर्षीय व्यावसायिकाने त्याच्या ७१ हजार रुपयांच्या होंडा अ‍ॅक्टिव्हासाठी १५ लाख रुपयांची नंबर प्लेट खरेदी केली होती. या नंबर प्लेटचा क्रमांक CH०१-CJ-०००१ असा होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

SCROLL FOR NEXT