Afghanistan: नमाज दरम्यान मशिदीत मोठा बॉम्बस्फोट, 100 लोकांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

Afghanistan: नमाज दरम्यान मशिदीत मोठा बॉम्बस्फोट, 50 लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तान मध्ये आज शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील उत्तर कुंदुज प्रांतात शुक्रवारच्या नमाज दरम्यान एका मशिदीत मोठा स्फोट झाला आहे.

वृत्तसंस्था

अफगाणिस्तान: अफगाणिस्तान Afghanistan मध्ये आज शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील उत्तर कुंदुज प्रांतात Kunduz Mosque शुक्रवारच्या नमाज दरम्यान एका मशिदीत Blast in Mosque मोठा स्फोट झाला आहे. याबद्दल तालिबान पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, या घटनेत किमान 100 लोक मारले गेले किंवा जखमी झाले आहेत अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. Afghanistan Bomb Blast

वृत्तानुसार, शिया मुस्लिमांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तालिबान Taliban अधिकारी दोस्त मोहम्मद ओबैदाह यांनी सांगितले की, 100 लोक हल्ल्याच्या कचाट्यात आले आहेत. यातील बहुतेक लोक मरण पावले आहेत. तरी वृत्तसंस्थेनुसार, 50 लोकांचा मृत्यू, 90 हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक महिती समोर येत आहे.

माहिती आणि संस्कृती उपमंत्री जबीउल्ला मुजाहिदी यांनी घटनेची पुष्टी केली. ते म्हणाले की, आज दुपारी कुंदुजमधील खानाबाद बंदर भागात शिया नागरिकांच्या मशिदीला स्फोट करण्यात आला आणि यामुळे अनेक नागरिक मरण पावले आणि जखमी झाले.

तर, सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहे आणि हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारच्या नमाजसाठी मशिदीत 300 लोक उपस्थित होते. झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की किमान 100 लोक हल्ल्याच्या कचाट्यात आले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT