Morbi Cable Bridge Collapses Saam TV
देश विदेश

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी 9 जणांना अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी आयपीसीच्या कलम 304, 308 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अहमदाबाद : गुजरातमधील  (Gujrat) मोरबी येथील पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी नऊ जणांना अटक केली. या घटनेच्या संदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये दोन मॅनेजर, दोन दुरुस्ती कंत्राटदार पिता-पुत्र, तीन सुरक्षा रक्षक आणि दोन तिकीट लिपिक यांचा समावेश आहे.

राजकोट रेंजचे पोलीस महानिरीक्षक अशोक यादव यांनी सांगितले की, मोरबीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, आम्ही याबाबत शोक व्यक्त करतो. काल संध्याकाळी 6.30 वाजता हा पूल कोसळला. आम्ही सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी आयपीसीच्या कलम 304, 308 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईल, असंही त्यांनी सांगितलं. (Latest News)

अशोक यादव यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये ओरेवा कंपनीचे मॅनेजर आणि तिकीट क्लर्क यांचा समावेश आहे. स्थानिक लोकांनी बचाव कार्यात खूप मदत केली आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून ही दुर्घटना घडली. या अपघातात 134 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुलाच्या ऑपरेटर कंपनीने वेळेपूर्वीच पूल खुला केल्याचा आरोप होत आहे.

अटक झालेल्यांची नावे

दीपक पारेख, दिनेश दवे, मनसुख टोप्या, मदेव सोळंकी, प्रकाश परमार, देवांग परमार, अल्पेश गोहिल, दिलीप गोहिल आणि मुकेश चौहान अशी पोलिसांनी अटक केलेल्या 9 जणांची नावे आहेत.

मदतीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. याशिवाय गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १५००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीतील 18k, 22k आणि 24k चे दर किती?

Rajyabhishek Din 2026: आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम...; राज्याभिषेक दिनानिमित्त खास मराठी शुभेच्छा अन् चारोळ्या

Face care: मॉइश्चरायझिंग आणि ग्लोईंग स्किनसाठी, रोज रात्री करा 'या' पेस्टने करा ५ मिनिटं मसाज

Maharashtra News Live Update: शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता लाखोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडच्या पायथ्याशी दाखल

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

SCROLL FOR NEXT