Biporjoy News Saam TV
देश विदेश

Maharashtra Monsoon Update: बिपरजॉयमुळे मान्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट कायम आहे. या चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे.

Shivani Tichkule

Cyclone Biparjoy Effect: बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट कायम आहे. या चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ 65 किमी वेगाने जोधपूरच्या दिशेने सरकत आहे. या वादळामुळे सर्व संरक्षण आणि बचाव यंत्रणा सतर्क आहेत, तर भारतीय हवामान विभागाकडून हे वादळ लवकरच शांत होईल, असा दावा केला जात आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, या चक्रीवादळामुळे देशात काही भागात ऊन तर काही भागात पाऊस असे चित्र पाहायला मिळत आहे. या चक्रीवादळामुळे मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात 23 जूननंतर पुन्हा पावसाला सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, दक्षिण आणि ईशान्य भारतात 18 ते 21 जून दरम्यान पावसाच्या (Rain) सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आधीच लांबणीवर गेलेला पाऊस चक्रीवादळामुळे आता आणखी रखडण्याची चिन्हं दिसून येत आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी योग्य काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT