Monsoon Update News Saam Tv
देश विदेश

Monsoon Update : मान्सून आला रे! ८ दिवस आधीच केरळात धडकला, हवामान विभागानं केलं कन्फर्म!

Monsoon arrival in kerala : मान्सून अखेर भारतात आला. भारतीय हवामान खात्यानं शनिवारी मान्सूनचं आगमन झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं. विशेष म्हणजे १ जूनला वर्दी देणारा मान्सून यंदा ८ दिवस आधीच केरळमध्ये धडकला आहे.

Nandkumar Joshi

अवघा देश ज्याची चातकासारखी वाट बघतो तो मान्सून अखेर भारतात धडकला. मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. भारतीय हवामान खात्यानं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. साधारणपणे १ जून रोजी मान्सून भारतात दाखल होतो. पण यंदा ८ दिवस आधीच मान्सूननं वर्दी दिली आहे. मान्सून यावर्षी लवकरच दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं आधीच वर्तवला होता. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांत मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, मान्सून आज, २४ मे २०२५ रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. साधारणपणे १ जून रोजी मान्सून दाखल होतो. पण यंदा मान्सून आठ दिवस आधीच केरळमध्ये पोहोचला आहे. सन २००९ मध्ये २३ मे रोजी मान्सून धडकला होता. त्यानंतर पहिल्यांदाच मान्सून लवकर दाखल झाला आहे. २०२४ मध्ये मान्सूनचं ३० मे रोजी आगमन झालं होतं.

पुढील दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्यानं नुकताच वर्तवला होता. पुढील सात दिवसांत केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचला तरी, अन्य राज्यांत पाऊसही वेळेआधीच कोसळेल असं नाही.

मान्सून कोणत्या वर्षी किती तारखेला भारतात आला?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सन २०२३ मध्ये मान्सून ८ जून रोजी धडकला होता. २०२२ मध्ये २९ मे, २०२१ मध्ये ३ जून, २०२० मध्ये १ जून, २०१९ मध्ये ८ जून, २०१८ मध्ये २९ मे, २०१७ मध्ये ३० मे, २०१६ मध्ये ८ जून, २०१५ मध्ये ५ जून, २०१४ मध्ये ६ जून, २०१३ मध्ये १ जून, २०१२ मध्ये ५ जून, २०११ मध्ये २९ मे आणि २०१० मध्ये ३१ मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT