Skymet Monsoon Predication  yandex
देश विदेश

Skymet Monsoon Predication: यंदा कसा असेल मान्सून; महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये वरुणराजाची असणार का कृपादृष्टी?

Skymet Weather : भारतात यंदा जून आणि सप्टेंबरदरम्यान सामन्य मान्सून राहण्याची शक्यता आहे. देशात ८६८.६ मिलीमीटर पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवलाय. यावर्षी देशात १०२ टक्के पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. अहवालानुसार जून ते सप्टेंबरपर्यंत मध्य आणि पश्चिम भागात सामन्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

Skymet Monsoon Predication 2024 :

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. स्कायमेटच्या खासगी हवामान संस्थेच्या अहवालानुसार, यावर्षी सामान्य मान्सून अपेक्षित आहे. यावर्षी जून आणि सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान भारतात सामान्य मान्सून राहण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अहवालानुसार, यावर्षी जून आणि सप्टेंबरच्या दरम्यान भारतामध्ये सामान्य मान्सून राहण्याची शक्यता आहे. देशात ८६८.६ मिलीमीटर पाऊस पडणार अशून या पावसाची टक्केवारी १०२ टक्के असणार आहे.(Latest News)

महाराष्ट्रात कसा असेल पावसाळा Monsoon in Maharashtra

'मान्सून फोरकास्ट 2024' या शीर्षकाच्या अहवालानुसार भारताच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात अनुकूल पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या मुख्य मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात पुरेसा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर बिहार, झारखंड, ओडिसा, आणि पश्चिम बंगालसहित पूर्व राज्यांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. स्कायमेटनुसार केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोव्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. देशाच्या मध्य भागात सामान्य पाऊस होणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांच्या मतानुसार, अल निनो जलद गतीने ला नीनामध्ये बदलत आहे. ला नीना वर्षांमध्ये मान्सूनमध्ये मजबूतपणे रुपांतरीत होत आहे. सुपर एल निनोचे मजबूत ला निनामध्ये संक्रमण झाल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या चांगला मान्सून तयार झालाय. एल निनोच्या अवशिष्ट परिणामांमुळे नुकसान होण्याच्या जोखमीसह पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊ शकतो.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळीची शक्यता

देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय तापमान गरम होत आहे. तसा आता तापमानाचा पाराही हळूहळू वर चढत आहे. हवामान विभागाने काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याचबरोबर जवळपास ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते (Maharashtra Weather Forecast Update) असा, इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड – चाकण वाहतूक कोंडीविरोधात मोर्चा

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT