धक्कादायक! 3 महिन्याच्या चिमुकल्याला घरातून पळवून नेहून माकडाने केली हत्या Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! 3 महिन्याच्या चिमुकल्याला घरातून पळवून नेहून माकडाने केली हत्या

धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: हत्येच्या (killing) खूपघटना आजवर तुम्ही ऐकले किंवा बघितले असतील. मात्र, या बहुदा आरोपी (Accused) हा एखादा माणूसच असतो. मात्र, आता एक खूपच धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये चक्क एका माकडाने बाळाची हत्या केली आहे (Monkey). ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बागपत येथे घडली आहे.

हे देखील पहा-

बागपतमध्ये (Baghpat) शनिवारी रात्री उशिरा माकडाने घरामधील खोलीत झोपलेल्या ३ महिन्यांच्या बाळाला पळवून नेले होते. यानंतर घरातील लोकांनी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता हे बाळ पाण्याच्या टाकीमध्ये आढळून आले आहे. यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयामध्ये (hospital) दाखल करण्यात आले आहे. मात्र, डॉक्टरांनी या बाळाला मृत घोषित केले आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना (Family) मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गढी काळंजरी (Kalanjari) या गावात (village) एका घरात ३ महिन्यांचा केशव खाटेवर झोपला होता. रात्री १२ वाजेच्या सुमारास घरात शिरलेल्या एका माकडाने त्याला पळवून नेले होते. यानंतर बराच वेळ कुटुंबीयांनी बाळाचा शोध घेतला असता त्यांना केशव पाण्याच्या टाकीमध्ये (tank) आढळून आला आहे. केशवला पाण्याच्या टाकीमध्ये बघून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. लगेच ते दिल्लीतील (Delhi) एका रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आले होते.

मात्र, डॉक्टरांनी या बाळाला मृत घोषित केले होते. घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी अनेकवेळा तक्रार करून देखील याठिकाणची माकडे पकडली जात नसल्याने आता लोकांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ३ महिन्यांच्या केशवला आपला जीव गमवावा लागला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! छगन भुजबळ दिल्लीला जाणार? फडणवीस सरकारमध्ये 'या' नेत्याला मिळणार संधी? महत्त्वाची अपडेट समोर

Heart health warning signs: फक्त छातीत दुखणं नाही तर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Shocking : 'बाईSSS हा काय प्रकार!' स्पा करायला महिलेने डोळे बंद केले, सलून मालकाची नियत फिरली अन्...

Maharashtra News Live Update: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदासाठी अंबादास दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सिल्की केसांसाठी ५ सोप्या हेअरस्टाईल्स

SCROLL FOR NEXT