Gangster Lakhbir Singh Landa Saam Digital
देश विदेश

Gangster Lakhbir Singh Landa: गँगस्टर लखबीर सिंग लांडा भारताकडून दहशतवादी घोषित, पंजाब पोलिसांच्या मुख्यालयावरील रॉकेट हल्ल्यातील आहे मास्टरमाईंड

Gangster Lakhbir Singh Landa News: मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट हल्ल्यातील मास्टरमाईंड गँगस्टर लखबीर सिंग लांडाला भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. Gangster Lakhbir Singh Landa has been declared a terrorist by India

Sandeep Gawade

Gangster Lakhbir Singh Landa

मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट हल्ल्यातील मास्टरमाईंड गँगस्टर लखबीर सिंग लांडाला भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. दहशतवादविरोधी कायदा UAPA अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून ३३ वर्षीय लखबीर कॅनडाचा गँगस्टर आहे.

पंजाबच्या तरनतारन जिह्यात १९८९ मध्ये जन्म झालेला लखबीर २०१७ मध्ये कॅनडात पळून गेला होता. बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) कुख्यात खलिस्तानी गटाचा तो सदस्य असून हरविंदर सिंग उर्फ रिंडाशी लखबीरचे जवळचे संबंध आहेत. रिंडा पाकिस्तानातील गँगस्टर असून त्याने बब्बर खालसासोबत हातमिळवणी केल्याची माहिती समोर आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लखबीरने भारतात अनेक मोठे हल्ले केले आहेत. मोहालीतील रॉकेट हल्ल्यातील तो सामिल होता. तसेच आईडी, अत्याधुनिक शस्त्रे, स्फोटके पुरवण्यात त्याचा सहभाग होता. याचबरोबर अमली पदार्थांची तस्करी करणे, देशातील इतर भागांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. तसेच शिख फॉर जस्टिसचे गुरपतवंत सिंग पन्नू आणि खलिस्तानी टायगर फोर्सचा हरदीपसिंग निज्जरसर अनेक कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवाद्यांथी त्याचे जवळचे संबंध असल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT