२०२६ मध्ये मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार
केंद्रीय मंत्रिमंडळातील १२ रिक्त पदांवर कोणाची वर्णी
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार
भारतीय जनता पक्षाच्या नव्या टीम घोषणा झाल्यानतंर आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना वेग आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला सधी कधी होणार कोणाचं पत्ता कट होणार याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. या मंत्रिमंडळात नवीन मित्रपक्ष, युवा आणि महिला खासदारांचा समावेश केला जाऊ शकतो. यासह आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकांमधील राजकीय समीकरणांचाही यात विचार केला जाऊ शकतो.
घटनेच्या अनुच्छेद ७५(१ए) अन्वये केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह जास्तीत जास्त ८१ मंत्री असू शकतात. सध्या ही संख्या ६९ इतकी असून, १२ पदे रिक्त आहेत. सध्या १४ केंद्रीय मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खात्यांची जबाबदारी आहे. एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, या फेरबदलामुळे मंत्र्यांवरील कामाचा भार संतुलित करण्यास मदत होऊ शकते.
धर्मेंद्र प्रधान: पेपरफुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनाच्या सरकारला बॅकफूटला जावे लागले होते. त्यामुळे सरकारवर मोठी टीका झाली होती. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग बिट्टू: राज्यसभेतील कार्यकाळ संपल्यानंतर आपापल्या पदांचा राजीनामा दिला होता. कुरियन यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आणि बिट्टू यांनी रेल्वे राज्यमंत्री राजीनामा दिलाय.
पीयूष गोयल: नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखालील नवीन टीममध्ये नुकतीच राष्ट्रीय खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
हर्ष मल्होत्रा आणि पंकज चौधरी: मल्होत्रा यांची दिल्लीचे तर चौधरी यांची उत्तर प्रदेशचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हरदीप सिंग पुरी (पेट्रोलियम मंत्री) आणि बी.एल. वर्मा (सामाजिक न्याय राज्यमंत्री) यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ या नोव्हेंबरमध्ये संपत आहे.
सध्या मंत्रिमंडळात ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे १२ हून अधिक मंत्री आहेत. (उदा. ८१ वर्षीय जीतन राम मांझी). त्याचवेळी, ३८ वर्षीय के. राममोहन नायडू हे सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहेत. आगामी फेरबदलांमध्ये तरुण आणि महिला मंत्र्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरसिमरत कौर बादल यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र, यासंदर्भात अद्यापही उत्सुकता कायम आहे.
दरम्यान, 'आप' (AAP) सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या सात राज्यसभा खासदारांपैकी राघव चढ्ढा यांना संधी मिळू शकते. शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदारांची संख्या वाढल्यामुळे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा विचार मंत्रिमंडळातील पदासाठी केला जातोय. यासह तृणमूल काँग्रेस (TMC) विरुद्ध बंड करून 'एनसीपीआय' (NCPI) च्या बॅनरखाली एनडीएला (NDA) पाठिंबा देणाऱ्या गटालाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.