खळबळजनक! केरळमध्ये मॉडेलवर सामूहिक बलात्कार Saam Tv
देश विदेश

खळबळजनक! केरळमध्ये मॉडेलवर सामूहिक बलात्कार

केरळमधील (Kerala) कोची येथे एका मॉडेलवर सामूहिक बलात्कार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : केरळमधील (Kerala) कोची येथे एका मॉडेलवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. या २७ वर्षीय मॉडेलने स्वतःच पोलीस ठाण्यामध्ये जाऊन यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, ककनाडच्या एदाचिरा गावातील हॉटेलमध्ये ३ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे.

या मॉडेलने एफआयआरमध्ये सांगितले आहे की, आरोपीने तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले होते आणि नंतर रूम लॉक करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. यादरम्यान आरोपीने अनेक व्हिडिओ बनवले आणि तिला सांगितले न ऐकल्यास ते शेअर करण्याची धमकी देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

सामूहिक बलात्कार झालेली पीडिता केरळच्या मलप्पुरम (Malappuram) येथील मूळची रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती आरोपींच्या बोलावण्यावरून कोची या ठिकाणी गेली होती. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ आणि २ डिसेंबर दिवशी मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. हे ३ आरोपी हे मॉडेलच्या ओळखीचे होते. सालिन नावाच्या आरोपीच्या पुढाकाराने तिला या हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. Model abuse in Kerala

मॉडेलच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करणार्‍या आयओंच्या दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पीडित महिलेला न्यायालयात हजर करून, तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. याचबरोबर त्यांनी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाचीही चौकशी यावेळी करण्यात आली आहे. एफआयआर नोंदवल्यापासून शमीर आणि अजमल फरार आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT