Election Commission Saam Digital
देश विदेश

Mizoram Election Result Date: मिझोराम विधानसभा निवडणूक निकालाची तारीख बदलली; निवडणूक आयोगाने सांगितलं कारण

Mizoram Election Result Date Update: मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने बदलली आहे. निवडणूक आयोग रविवारी ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याऐवजी सोमवारी अर्थात ४ डिसेंबर निकाल जाहीर करणार आहे.

Vishal Gangurde

Mizoram Election Result:

मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने बदलली आहे. निवडणूक आयोग मिझोराम विधानसभेचा निकाल रविवारी ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्याऐवजी सोमवारी अर्थात ४ डिसेंबर जाहीर करणार आहे. केंद्रीय निवडूक आयोगाने शुक्रवारी रात्री याबाबत 'एक्स'वर पोस्ट करत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलल्यानंतर त्यामागील कारणही स्पष्ट केलं. निवडणूक आयोगाने म्हटलं की, 'मिझोराममधील नागरिकांमध्ये रविवारीचं महत्व अधिक आहे. यामुळे निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलण्यात आली. यासाठी बहुतेक लोकांनी मागणी केली होती. यामुळे मिझोराममध्ये ३ डिसेंबर रोजी ४ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अन् निवडणूक आयोगाने बदलली तारीख

तत्पर्वी, तीन डिसेंबर रोजी रविवार आहे. मिझोराममध्ये ख्रिश्चन समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मिझोराममध्ये ख्रिश्चन बांधवाची संख्या ८७ टक्के आहे. रविवारी ख्रिश्चन समाजाचे बांधव चर्चमध्ये जातात. यामुळे मिझोराममधील नागरिकांची तारीख बदलण्याची मागणी होती. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या राज्यात सोमवारी मतमोजणी होईल, त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मिझोराममध्ये कोण जिंकणार?

एका मीडियाच्या एग्झिट पोलनुसार, मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) ४० जागांपैकी १५ ते २० जागा निवडूण येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर जोराम पीपल्स मुव्हमेंटला (जेडपीएम) १२ ते १८ जागा निवडून येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काँग्रेस २ ते ८ जागा जिंकू शकते.

काँग्रेसने काय म्हटलं?

केंद्रीय निवडणूक आयोगाने मिझोराम विधानसभा निकालाची तारीख बदलल्यानंतर काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'राजकीय पक्षांनी आधीच मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख ४ डिसेंबर रोजी करण्यास सांगितली होती. गेल्या एक महिन्यांपासून मागणी करत आहोत. मात्र, त्यावेळी निवडणूक आयोग गप्प होतं. मात्र, निकालाच्या काही दिवस आधीच तारीख बदलली. निवडणूक आयोगाने तारीख बदलण्यास उशीर का केला? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT