Mizoram Assembly Election Results 2023 Saam TV
देश विदेश

Mizoram Election 2023 Result: मिझोरममध्ये काँग्रेस गेमचेंजर ठरणार? चौरंगी लढतीत कुणाचे सरकार? आज मतमोजणी

Mizoram Assembly Election Result: ४ पैकी ३ राज्यात भाजपने बाजी मारल्यानंतर आता मिझोरममध्ये कुणाचे सरकार येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Satish Daud

Mizoram Assembly Election Result 2023

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभेची मतमोजणी पार पडल्यानंतर आज मिझोरम विधानसभेची मतमोजणी होणार आहे. ४ पैकी ३ राज्यात भाजपने बाजी मारल्यानंतर आता मिझोरममध्ये कुणाचे सरकार येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मिझोरम विधानसभेच्या ४० जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या निवडणुकीत एकूण १७४ उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), प्रमुख विरोधी पक्ष झोराम पिपल्स मुव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेसने ४०-४० जागावर निवडणूक लढली आहे. तर भाजपाने २३ आणि आम आदमी पार्टीने ४ जागांवर नशीब आजमाविले आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मिझोरममध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट आणि झोराम पिपल्स मुव्हमेंट मध्ये काटे की टक्कर होण्याचा अंदाज आहे. ४ पैकी ३ राज्यात पिछाडीवर पडलेली काँग्रेस मिझोरममध्ये गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

विविध संस्थांच्या एक्झिट पोलनुसार, मिझोरममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सध्या सत्तेत असणाऱ्या मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) देखील पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी आहे.

मिझोरम निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे या राज्यात कोणता पक्ष सत्तेत येतो? मतदार कुणाला कौल देणार हे निकालांनंतरच स्पष्ट होणार आहे. मिझोरममधील ४० जागांपैकी ३९ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Accident : काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, मित्राच्या साखरपुड्याला निघाले, पण ३ मित्रांचा वाटेतच घात

Famous Actress Wedding : मालिकेच्या सेटवर सुरू झाली लव्ह स्टोरी, ४ वर्ष केलं डेट; प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्न बंधनात, पाहा VIDEO

Sambhajinagar: नवरा- बायकोचा ट्रॅफिक पोलिसावर हल्ला, भररस्त्यात शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

PM Mudra Yojana: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज

SCROLL FOR NEXT