Crime News Saam TV
देश विदेश

Bihar Crime News: अल्पवयीन भाचा मामीच्या प्रेमात; अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं, अन्...

Marathi Crime News: या धक्कादायक घटनेचा असा झाला खुलासा

Shivani Tichkule

Bihar Crime News Today: बिहार पोलीस स्टेशन हद्दीतील पहारपुरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक अल्पवयीन भाचा आपल्या मामीच्या प्रेमात पडला आहे. त्यानंतर त्याने तिचे अश्लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्याला सुरुवात केली. भाच्याच्या याच त्रासाला कंटाळून सोमवारी रात्री महिलेने आत्महत्या केली. (Latest Marathi News)

या घटनेनंतर परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मृताचे नातेवाईक घरी पोहोचल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. (Crime News)

खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केला

मिळालेल्या माहितीनुसार भाचा अनेक महिन्यांपासून आपल्या मामीला ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे मामीने या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. भाच्याने महिलेचे अनेक खाजगी व्हिडिओ बनवले होते. हे सर्व व्हिडिओ तो व्हायरल करण्याची धमकी देत होता.

मृताच्या भावाने केला खुलासा

बहिणीच्या आत्महत्येची माहिती भावाला मिळताच तो कुटुंबासह बहिणीच्या घरी पोहोचला. तयावेळी घरात एकही सदस्य उपस्थित नव्हता. बहिणीचा मोबाईल घरात ठेवला होता. बहिणीच्या मोबाईलचा पासवर्ड त्याला माहीत होता. बहिणीच्या घरी पोहोचल्यावर आधी मोबाईल तपासला. त्यात भाच्याने आपल्यला ब्लॅकमेल केल्याचं लिहिलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी भाच्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT