Turkey Mine Blast Saam Tv
देश विदेश

Turkey Mine Blast : तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट; 22 ठार, अनेक जखमी

तुर्कीच्या कोळसा खाणीत स्फोट झाला आहे. या स्फोटात जवळपास 22 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.

वृत्तसंस्था

टर्की माइन ब्लास्ट : उत्तर तुर्कीतील (Turkey) कोळसा खाणीत स्फोट (Mine Blast) झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढणायची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Turkey Mine Blast Latest Update)

तुर्कीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या महतीनुसार, उत्तर तुर्कीतील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, बचाव पथक खाणीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. (Breaking News Marathi)

कुठे झाला स्फोट?

बार्टिनच्या काळ्या समुद्र किनारी भागातील अमासरा शहरातील सरकारी टीटीके अमासरा मुसेसे मुदुरलुगु खाणीत शुक्रवारी हा स्फोट झाला. ऊर्जा मंत्री फातिह डोनमेझ यांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार हा स्फोट फायरॅम्पमुळे झाला असावा.

स्फोटाच्या वेळी खाणीत 110 लोक उपस्थित

गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, स्फोटाच्या वेळी खाणीत 110 लोक उपस्थित होते. स्फोटानंतर बहुतेक कामगार पळून जाण्यात यशस्वी झाले होते, परंतु 49 लोक अतिजोखमीच्या भागात अडकले होते. काहींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी ट्विटरवर दिली. खाणीमुळे किती लोक जखमी झाले हे त्यांनी सांगितले नाही, मात्र आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. तुर्कस्तानची आपत्ती व्यवस्थापन एजन्सी एएफएडीने सांगितले की, अनेक बचाव पथके या भागात पाठवण्यात आली आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Rules Change June 2026: ATM चा व्यवहार ते एलपीजी, १ जूनपासून कोणकोणते बदल होणार?

Maharashtra News Live Update: परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतील उमेदवारी घोषित

वयाची पन्नाशी ओलांडली तरी दिसते इतकी सुंदर; 'धक धक गर्ल'चं गुलाबी सौंदर्य पाहून उडेल झोप

Panhala Fort : कोल्हापूरजवळील ऐतिहासिक रत्न! पन्हाळा किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT