MIG 29 plane crash X/social media
देश विदेश

Plane Crash : हवाई दलाचं MIG- 29 विमान कोसळलं, आग्र्यात भीषण अपघात, VIDEO

IAF MIG- 29 Plane Crash at Agra : हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं. आग्रा येथे हा अपघात घडला. दुर्घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हवाई दलानं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Nandkumar Joshi

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हवाई दलाचं मिग २९ हे लढाऊ विमान कोसळलं. हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर लगेच आग लागली. पायलटसह दोघांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते या दुर्घटनेतून बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी अपघातग्रस्त विमानापासून जवळपास दोन किलोमीटरवर पायलट आणि त्याचे सहकारी आढळून आले.

हे MiG 29 लढाऊ विमान कागारौल-सोनिया गावाजवळच्या एका शेतात कोसळलं. हे लढाऊ विमान जमिनीवर कोसळताच पेट घेतला. हा अपघात कसा घडला याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. काही तांत्रिक बिघाड होता का? यामागे आणखी कोणते कारण होते का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विमानाने पंजाबच्या आदमपूर येथून उड्डाण भरलं होतं. सरावासाठी ते आग्राकडे जात होते. त्याचवेळी ही घटना घडली. हवाई दलानं चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच आग्रा कॅन्टॉनमेंटमधून लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त विमान आगीत जळून खाक झाले आहे.

...म्हणून मोठा अनर्थ टळला

आग्रा येथील एका गावाजवळच्या शेतात लढाऊ विमान कोसळलं. रहिवासी वस्तीपासून दूर अंतरावर हे विमान कोसळलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हे विमान गावाजवळच्या एका शेतात कोसळलं. त्यानंतर विमानाने पेट घेतला. मिग २९ हे लढाऊ विमान अनेक वर्षांपासून हवाई दलाच्या सेवेत आहे.

सप्टेंबरमध्ये बाडमेरमध्येही कोसळलं होतं विमान

यावर्षी सप्टेंबरमध्ये राजस्थानच्या बाडमेरमध्ये हवाई दलाचे मिग २९ विमान कोसळलं होतं. या दुर्घटनेतून विमानाचे पायलट सुखरूप बचावले होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडली होती. या घटनेच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले होते. सुदैवाने हे विमान निर्जनस्थळी कोसळले होते. त्यामुळे अनर्थ टळला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traditional Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील या 4 मंगळसुत्रांच्या लेटेस्ट डिझाईन्स आणि हे पारंपारिक दागिने

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT