Rising tensions in the Middle East spark debate over the military strength of Israel and Iran. saam tv
देश विदेश

इस्त्रायल आणि इराणमध्ये कोण आहे बलवान? इराणच्या व्हिडिओनं अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली| Video

Iran Releases Military Power Video : अमेरिका- इस्त्रायलं इराणवर विध्वसंक हल्ला करून खामेनेईंची हत्या केली. मात्र याचं हत्येनंतर इराणी सैन्यानं जारी केलेला एक व्हिडिओ अनेकांची झोप उडवणारा ठरलाय. इस्त्रायल आणि इराणची ताकद किती आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

ही आहेत बॅलिस्टिक मिसाईल्स..ही अंडरग्राऊंड मिसाईल सिटी. हो ही आहे इराणची अंडरग्राऊंड मिसाईल सिटी. जमिनीच्या पोटात शेकडो फूट खाली इराणी ड्रोनचा हा महाकाय साठा..ज्याने अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली.

या शस्त्रांच्या आधारेच इराण महायुद्धाला सज्ज झालयं.खामेनींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी प्रतिशोधाच्या आगीत जळणाऱ्या इराणनं जारी केलेला हा व्हिडिओ म्हणजे शत्रूराष्ट्राला दिलेला थेट इशारा आहे. शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने कुठल्या क्षेपणास्त्रांचा साठा केला आहे ? पाहूयात.

1) शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक मिसाईल

मारक क्षमता अंदाजे 150 ते 800 किमी

शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक मिसाईलमध्ये फतेह, झोल्फाघर, शाहाब 1/2 चा समावेश

ही क्षेपणास्त्रे एकाच वेळी जवळच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यास सक्षम

2) मिड- रेंज बॅलिस्टिक मिसाईल

मारक क्षमता अंदाजे 1500 ते 2000 किमी

शाहाब- 3, इमाद, 'खोर्रमशहर' आणि 'सेज्जिल' चा मिड रेंज बॅलिस्टिक मिसाईलमध्ये समावेश

या क्षेपणास्त्रांमुळे इस्रायल, कतार , बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया आणि युएईमधील अमेरिकन तळ थेट इराणच्या टप्प्यात

सेज्जिल हे घन-इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र युद्धात शत्रूला जलद प्रत्युत्तर देण्यास सक्षम

3) क्रूझ मिसाईल

इराणकडे सौमार, या-अली, पावेह आणि हौवेजेह ही क्रूझ मिसाईल आहेत

सौमार क्रूझ मिसाईलची मारक क्षमता तब्बल 2500 किमी

क्रूझ मिसाईल जमिनीपासून 50 मीटर उंचीवर शत्रूवर हल्ला करतात

या मिसाईला रडारवर शोधणे आणि ट्रॅक करणे हवाई संरक्षण यंत्रणेसाठी कठीण

4) वन-वे अटॅक ड्रोन

शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा उद्धवस्त करण्यास सक्षम

दरम्यान इराणची ही मिसाईल सिटी अमेरिका किंवा इस्रायलच्या मोठ्या हल्ल्यानंतरही सुरक्षित राहू शकते , हे इराणनं जारी केलेल्या व्हिडिओतून स्पष्ट झालयं. मात्र इराणला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी इस्रायलही तयार आहे... इस्त्रायलची क्षेपणास्त्र क्षमता किती आहे? पाहूयात.

1) क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली

आयरन डोम मिसाईल

कमी पल्ल्याच्या तोफगोळ्यांना हवेतच नष्ट करण्याची क्षमता

अॅरो-2 आणि अॅरो-3

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना अंतराळाच्या सीमेवरच नष्ट करण्यासाठी विशेष डिझाइन

इराणच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना उद्धवस्त करण्याची क्षमता

2) बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे

जेरिको सिरीज

मधील बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची मारक क्षमता 1500 ते 5000 किमी

लोरा मिसाईलची

मारक क्षमता 400 किमी पर्यंत

जमिनीवरून किंवा समुद्रातून हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागता येतं

3) नौदल आणि हवाई क्षमता

गेब्रियल

इस्रायलचे प्रगत अँटी-शिप क्षेपणास्त्र

डेलिलाह मिसाईल

हवेत घिरट्या घालून संधी मिळताच शत्रूवर अचूक हल्ला करण्याची क्षमता

एकीकडे इराण आणि इस्रायलच्या क्षेपणास्त्रांमुळे जगाची झोप उडालेली असताना दुसरीकडे अमेरिकाही सावध झालीय. दरम्यान इराण युद्धजन्य परिस्थितीत गनिमी काव्याच्या पद्धतीचा वापर करतो. त्यामुळे अमेरिकेला इराणवर नियंत्रण मिळवण्यासाठी जमिनीवर युद्ध करावं लागेल. त्यासाठी अमेरिकेला लाखो सैन्याची आवश्यकता आहे. मात्र इराणची शस्त्रसज्जता पाहता अमेरिका असा थेट धाडसी निर्णय घेणार नाही. त्यामुळे इराण आणि इस्त्रायल-अमेरिका आता एकमेकांविरोधात काय रणनीती आखतात याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT