Tensions escalate near the Strait of Hormuz as Iran warns of targeting ships amid US conflict. saam tv
देश विदेश

Iran-US War: 'होर्मुझमध्ये जहाज दिसलं की पेटवून देणार'; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा जगाला इशारा

Strait of Hormuz Crisis: अमेरिकेनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं इराणने होर्मुझचा जलमार्ग बंद करुन जगाची नाकेबंदी केलीय. हा जलमार्ग रोखल्यानं जगावर काय परिणाम होऊ शकतो ? इराणच्या निर्णयाचा भारताला कसा फटका बसू शकतो ? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • होर्मुझ जलमार्ग जगातील महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे.

  • अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणने जहाजांवर हल्ल्याचा इशारा दिला आहे.

  • जलमार्ग बंद झाल्यास जागतिक तेल पुरवठा धोक्यात येऊ शकतो.

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणविरोधात युद्ध छेडल्यानंतर एकमेकांवर हजारो क्षेपणास्त्र डागले आहेत. इराणने अमेरिकेची लष्करी तळ असलेल्या शेजारच्या 9 देशांना लक्ष्य केलंय. मात्र हे कमी होतं की काय आता युद्धात संपूर्ण जग होरपळण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण इराणने जगाची नाकेबंदी करण्याची रणनीती आखलीय. इराणने आपल्या हद्दीतील होर्मुझ जलमार्ग बंद केलाय..एवढंच नाही तर होर्मुझच्या जलमार्गावर जहाज दिसलं तर जहाज जाळून टाकू असा इशाराच इराणने दिलाय. मात्र होर्मुझचा जलमार्ग जगासाठी किती महत्वाचा आहे. पाहूयात.

होर्मुझचा जलमार्ग ही जगातील अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाते. कारण याच मार्गाने जगातील तब्बल 30 टक्के तेल वाहतूक होते.. दररोज 2 कोटीपेक्षा जास्त बॅरल तेलवाहतूक होर्मुझ जलमार्गाने होते. सौदी अरेबिया, इराण, यूएई, कुवेत आणि इराकसारख्या मोठ्या तेल उत्पादक देशांसाठी निर्यातीचा हाच मार्ग आहे.

तर भारतही सर्वाधिक कच्चं तेल याच मार्गाने आयात करतो. एवढंच नाही तर कतार या जगातील सर्वात मोठ्या LNG च्या उत्पादनाचा पुरवठाही याच मार्गाने होतो. त्यामुळे हा मार्गच आता बंद झाल्यानं जगात उर्जेचा तुटवडा निर्माण होऊन मंदीची शक्यता आहे. तर भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडू शकतात.

खरं तर अमेरिका आणि इराणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्याआधी तेलाचे दर 66 डॉलर प्रति बॅरल इतके होते... मात्र अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर आता इराणने होर्मुझ जलमार्ग बंद करण्याची धमकी दिलीय.. त्यामुळे तेलाचे दर 16 टक्क्यांनी तर नैसर्गिक गॅसचे दर 30 टक्क्यांनी वाढलेत. याच दरम्यान भारताकडे केवळ 25 दिवसांचाच तेलसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.. त्यामुळे इराण विरुद्ध अमेरिका युद्ध थांबणार की युद्ध सुरुच राहिल्याने महागाईच्या आगीत जग होरपळून निघणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT