Mexico Shocking News Saam Tv
देश विदेश

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Mexico News: मेक्सिकोमध्ये एका १४ वर्षीय मुलीचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला. स्तन वाढवण्यासाठी या मुलीने शस्त्रक्रिया करून घेतली पण काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या वडिलांनी चौकशीची मागणी केली आहे.

Priya More

Summery:

  • मेक्सिकोमध्ये १४ वर्षीय मुलीचा सर्जरीनंतर मृत्यू झाला.

  • पालोमा निकोलने स्तन वाढवण्याची शस्त्रक्रिया केली होती.

  • मृत्यूपत्रात श्वसनाच्या आजाराचं कारण दिलं होतं.

  • वडिलांनी शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली.

मेक्सिकोतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी १४ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्तन वाढवण्यासाठी या मुलीने शस्त्रक्रिया करून घेतली होती. या शस्त्रक्रियेनंतर तिचा मृत्यू झाला. सुरूवातीला मुलीच्या कुटुंबीयांना तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळाले नव्हते. पण जेव्हा त्यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

पालोमा निकोल अरेलानो एस्कोबेडो असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव होते. २० सप्टेंबरला या मुलीचा मृत्यू झाला. या मुलीच्या मृत्यूपत्रामध्ये तिचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे आमि मेंदूला सूज आल्यामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले. पण तिच्या वडिलांनी तिचा मृत्यू कॉस्मेटिक सर्जरी झाल्यानंतर झाल्याचा आरोप केला आहे. सत्य लपवण्यासाठी तिच्या मृत्यू पत्रात श्वसनाचा आजार असल्याचे खोटे कारण नमूद करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मृत्यू झालेल्या मुलीच्या वडिलांनी दावा केला की, मुलीच्या अंत्यसंस्कारापर्यंत त्यांना तिने शस्त्रक्रिया केल्याची माहिती नव्हती. पण नंतर त्यांना तिच्या शरीरावर व्रण आणि स्तनांची सर्जरी केल्याचे दिसले. अधिकाऱ्यांनी मुलीचे मृत्यूपत्र खूपच वेगाने तयार केले. त्यामुळे त्यांना अधिकच संशय आला. अधिकाऱ्यांनी मृत्यूपत्र ताबडतोब दिले असे म्हणत त्यांनी ते इतक्या लवकर कसे तयार झाले याबाबत संशय व्यक्त केला.

याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी या सर्जरीशी संबंधित असलेल्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. मृत मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मेक्सिकन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पुष्टी केली आणि सांगितले की, ते पालोमाच्या मृत्यूच्या आणि कथित शस्त्रक्रियेच्या सभोवतालच्या परिस्थितीची चौकशी करत आहेत. ही प्रक्रिया कुठे किंवा कोणत्या परिस्थितीत करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT