पाऱ्यापासून शुद्ध आणि अस्सल सोनं बनवणं आता शक्य होणार आहे... होय तुम्ही ऐकलं ते खरंय ..अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील 'मॅरेथॉन फ्युजन' या स्टार्टअप कंपनीनं पाऱ्यापासून अस्सल सोनं बनवण्याचा दावा केलाय..ज्यामुळे जगभरातील सराफ बाजारात आणि वैज्ञानिकांमध्ये मोठी चर्चा रंगलीय...सामान्य रासायनिक प्रक्रियेमध्ये धातूंचे अशा प्रकारे रूपांतर करणे अशक्य असते, मात्र या कंपनीने अणुविज्ञानाचा आधार घेत पाऱ्यापासून सोनं कसं तयार केलं...पाहूयात...
पाऱ्यापासून सोनं कसं बनवलं जातं?
पाऱ्यात 80 प्रोटॉन तर सोन्यात 79 प्रोटॉन असतात
पाऱ्यातील 1 प्रोटॉन कमी केल्यास पाऱ्याचं रुपांतर सोन्यात होतं
न्यूक्लियर फ्युजन पाऱ्यावर वेगवान न्यूट्रॉनचा मारा करतं.
ज्यानंतर न्यूट्रॉनच्या आघातामुळे पाऱ्यामधील एक प्रोटॉन कमी होतो आणि पाऱ्याचं रुपांतर मर्क्युरी 197 मध्ये होते
त्यानंतर मर्क्युरी 197 पासून शुद्ध सोनं तयार केलं जातयं..
विशेष म्हणजे 'मॅरेथॉन फ्युजन' कंपनीनं CERNपेक्षा 10 पट अधिक वेगानं पाऱ्यापासून सोनं तयार केल्याचा दावा केलाय...
या दाव्यामुळे लॅब-मेड हिऱ्यांप्रमाणे सोन्याचे भाव कमी होण्याची गुंतवणूकदारांना भीती आहे...मात्र खरचं पाऱ्यापासून सोनं तयार केल्यास सोन्याचे भाव कमी होणार का?
सोन्याचे भाव कमी होणार?
लॅबमध्ये सोनं तयार करणं खाणीतून सोनं काढण्यापेक्षा अब्जावधी पट महाग
प्रयोगशाळेत केवळ 1 ग्राम सोनं तयार करण्यासाठी प्रचंड वेळ लागू शकतो
या प्रयोगामुळे सध्या तरी सोन्याचे भाव घसरण्याची कुठलीही शक्यता नाही
त्यात कंपनीचा हा फ्युजन प्रकल्पात दरवर्षी फक्त दोन टन सोन्याचं उत्पादन होईल... मात्र सोन्याची मागणी त्याहून कैक पटीनं अधिक आहे.
दरम्यान, या तंत्रज्ञानाचा वापर फक्त सोनं तयार करण्यासाठी नव्हे तर न्यूट्रॉनद्वारे जस्त धातूवर मारा करून कॉपर-64 आणि कॉपर-67 सारखे वैद्यकीय उपचारांसाठी आणि कर्करोगाच्या निदानासाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे अणू तयार करण्यासाठीही होऊ शकतो, असा दावा कंपनीने केलाय...मात्र जोपर्यंत इतर वैज्ञानिक या प्रयोगाची पुष्टी करत नाहीत आणि उत्पादन खर्च स्पष्ट होत नाही, तोपर्यंत पाऱ्यापासून सोनं बनवण्याचा हा प्रकार फक्त एका कंपनीच्या दाव्यापुरता मर्यादित राहिलं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.