Malkapur News Saam TV
देश विदेश

Malkapur News: मनोरुग्णाचा मलकापूर रेल्वे स्थानकात थरार; डिझेल टँकरवर चढून उच्चदाब विद्युत वाहिनीला पकडले अन्...

जर मनोरुग्णाने विद्युत तारेला स्पर्श केला असता तर तो तिथेच जळून खाक झाला असता.

साम टिव्ही ब्युरो

Malkapur News: मनोरुग्ण कधी काय करतील याचा काही नेम नसतो. त्यांच्या मनाला जे ठिक आणि योग्य वाटेल तेच ते करत असतात. अशात काही वेळा त्यांच्याकडून अशा चूका होतात ज्यात ते स्वत:चा आणि दुसऱ्यांचा जीव देखील धोक्यात घालतात. अशीच एक थरारक घटना मलकापूर येथे घडली आहे. एक मनोरुग्ण थेट डिझेल टॅंकरवर चढला होता. त्याच्यावरती असलेल्या विद्युत तारेला त्याला पकडायचे होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली आहे. (Latest Marathi News)

सदर घटना मलकापूर रेल्वे स्थानकातील आहे. एक मनोरुग्ण काल या रेल्वे स्थानकात आला होता. स्टेशनवर आधीच एक डिझेल टॅंकरने भरलेली ट्र्रेन उभी होती. ट्रेन पाहून त्याला ट्रेनवर चढण्याची इच्छा झाली. यात आपल्याला इजा होईल किंवा हे चुकीचे आहे असे कोणतेही विचार त्याच्या मनात आले नाहीत. अगदी सहज तो ट्रेनवर गेला. तिथे गेल्यावर त्याने तेवढ्यावर आपली करामत थांबवली नाही.

पुढे या मनोरुग्णाला वर असलेल्या रेल्वेच्या उच्च दाब विद्युत वहिनीला पकडायचे होते. यासाठी तो उभा राहीला आणि उच्च दाब विद्युत वहिनी पकडण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात रेल्वे स्थानकात उपस्थित रेल्वे पोलिसांची नजर त्याच्यावर गेली. त्याचा आणि इतरांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी महत्प्रयासाने मोठ्या मोठ्याने ओरडून लागले. यामुळे मनोरुग्णाचं लक्ष विचलित झालं आणि मोठा अनर्थ टळला.

संपूर्ण रेल्वे स्टेशन झाले असते जळून खाक

पोलिसांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत मनोरुग्णाला खाली घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. कारण संपूर्ण ट्रेन (Train) डिझेल टॅंकरने भरलेली होती. जर मनोरुग्णाने विद्युत तारेला स्पर्श केला असता तर तो तिथेच जळून खाक झाला असता. संपूर्ण ट्रेनचा देखील मोठा स्पोट झाला असता. पोलिसांनी तात्काळ त्याला खाली घेतल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत. सध्या मनोरुग्णाला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT