Chile Wildfires News Saam TV
देश विदेश

Chile Wildfires चिलीतील घनदाट जंगलात भीषण आग, ११०० हून अधिक घरे जळून खाक; आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू

Chile Wildfires News: चिलीतील घनदाट जंगलात लागलेल्या आगीत आतापर्यंत ४० लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्याचबरोबर ११०० हून अधिक घरे जळून खाक झाली आहे.

Satish Daud

46 Killed In Chile Wildfires

दक्षिण अमेरिकन देश चिलीतील जंगलात शनिवारी (३ फेब्रुवारी) अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत या आगीत ४० लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्याचबरोबर ११०० हून अधिक घरे जळून खाक झाली आहे. चिलीचे गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी याबाबतची माहिती दिली.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून अजूनही जंगलातील काही भागात आगीच्या ज्वाला धुमसत आहेत. आगीबाबत माहिती देताना कॅरोलिना तोहा म्हणाले, "देशाच्या मध्य आणि दक्षिण भागात असलेल्या जंगलांना शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली". (Latest Marathi News)

"बघता-बघता आग जंगलातील जवळपास ४३ हजार हेक्टरवर पसरली. यामुळे लोकवस्ती परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांची घरे जळून खाक झाली. सुरुवातील काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य न झाल्याने लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी घरदार सोडवे लागले".

"या आगीत आतापर्यंत ४० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. तर हजारो लोकांची घरे जळून खाक झाली आहे. आमच्यासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे ही आग दाट लोकवस्तीच्या भागात पसरत आहे. त्यामुळे लोक, घरे आणि सुविधांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे", असंही कॅरोलिना तोहा म्हणाले.

दरम्यान, चिलीतील जंगलात आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडला आहेत. गेल्या वर्षी उन्हाळ्यात चिलीच्या जंगलात भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास २७ लोकांचा मृत्यू झाला होता. ही आग ४ लाख हेक्टरवर पसरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

Heart Disease Diet : चाळीशीनंतरही होणार नाहीत ह्रदयविकाराच्या समस्या, आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश; डॉक्टरांनी दिला सल्ला

Designer Blouse: लग्नसराईत प्लेन साडीत पण दिसाल उठून, ट्राय करा हे ७ ट्रेंडी युनिक स्वस्त डिझायनर ब्लाऊज

Chocolate Dry fruit Shake: उन्हाळ्यात प्या चॉकलेट ड्राय फ्रुट शेक; राहाल दिवसभर फ्रेश

SCROLL FOR NEXT