Delhi Alipur Factory Fire Saam TV
देश विदेश

Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! अलीपूरमध्ये कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे ३४ बंब घटनास्थळी, थरारक VIDEO

Delhi Alipur Factory Fire: दिल्लीतील अलीपूर भागात असलेल्या एका कारखान्याला सोमवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली.

Satish Daud

Delhi Alipur Factory Fire

दिल्लीतील अलीपूर भागात असलेल्या एका कारखान्याला सोमवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण कारखान्याला विळखा घातला. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुळाचे लोळ उठले. त्यामुळे अनेकांचा दम घुसमटला. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३४ बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक होत आहे. रविवारी (ता. २४) दुपारी दिल्लीतील नरेला येथील भोरगड औद्योगिक परिसरात चप्पल आणि चप्पल बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी ब्रोंटो स्काय लिफ्टच्या मदतीने साडेपाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली होती.

दरम्यान, ही घटना ताजी असताना सोमवारी पहाटे अलीपूर येथील एका तेल बनवण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण कारखान्याला विळखा घातला. आग इतकी भीषण होती, की परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोळ उठले.

आग लागल्याचे कळताच कारखान्यातील कामगारांनी वेळेवर बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमुळे उठणाऱ्या धुराचे लोळ परिसरातील घरांमध्ये पसरल्याने अनेकांचा जीव घुसमटला. सध्या अग्निशमन दलाचे ३४ बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या भीषण आगीचा व्हिडीओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

Rain Alert : मुंबईत अखेर मान्सूनचे दमदार आगमन, पुढील काही तास महत्त्वाचे; वाचा हवामानाचा अंदाज

जिमला न जाता मेथी, ओवा आणि बडीशेपचं पाणी प्या, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ओमराजेंसह ६ बंडखोर खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT