America Firing News Saam TV
देश विदेश

America Firing News : अमेरिका हादरली; बेछूट गोळीबारात २२ जणांचा मृत्यू, ५०-६० नागरिक जमखी

America Firing News Update : रॉबर्ट कार्ड (४० वर्ष) असे आरोपीचे नाव आहे.

प्रविण वाकचौरे

America News :

अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. लुईस्टनमध्ये झालेल्या गोळीबारात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ५०-६० लोक गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

रॉबर्ट कार्ड (४० वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. कार्ड हा यूएस रिझर्व्ह आर्मीचा देखील सदस्य आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो प्रसिद्ध केला असून लोकांकडून मदत मागितली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये लांब शर्ट आणि जीन्स घातलेला एक दाढीवाला व्यक्ती फायरिंग रायफल हातात धरलेला दिसत आहे. (Latest Marathi News)

लेविस्टनमधील सेंट्रल मेन मेडिकल सेंटरने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, या मास फायरिंगच्या घटनेत लोक जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फायरिंगची २०२२ नंतरची सर्वात मोठी घटना

अमेरिकेच्या फायरिंगच्या घटना चिंतेचा विषय आहे. लुईस्टनमधील हल्ला हा २०२२ सालानंतरचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो आहे. कारण गेल्या वर्षी मे महिन्यात टेक्सासमधील उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत गोळीबाराची घटना घडली होती. ज्यामध्ये दोन शिक्षकांसह १९ मुलांचा मृत्यू झाला होता. एका अहवालानुसार, २०२२ मध्ये अमेरिकेत गोळीबाराशी संबंधित ६४७ घटनांची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Weather Update: पुढील ३ दिवस पावसाचे; दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Girls Shirt Style: जिन्सवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट शर्ट; ऑफिस किंवा कॉलेजमध्ये दिलास सगळ्यात ग्लॅमरस

Mumbai Tourism: मुंबईकरांसाठी खुशखबर! 'गंगा आरती'चा दिव्य अनुभव घ्यायचाय? तर 'या' २ ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

SCROLL FOR NEXT