Security forces respond after a deadly supermarket shooting in Kyiv, Ukraine. saam tv
देश विदेश

Firing: आधी ओलीस ठेवलं नंतर धाड धाड धाड गोळ्या झाडल्या; सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, ६ जणांचा मृत्यू

supermarket shooting in Kyiv : युक्रेनमधील एका सुपरमार्केटमध्ये एका बंदूकधाऱ्याने अनेक लोकांना ओलीस ठेवले आणि एकामागून एक सहा जणांची हत्या केली. मात्र, नंतर सुरक्षा दलांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.

Bharat Jadhav

  • कीवमधील सुपरमार्केटमध्ये भीषण गोळीबार

  • बंदूकधाऱ्याने लोकांना ओलीस ठेवलं

  • सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोर ठार

युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. तेथील एका सुपरमार्केटमध्ये एका बंदूकधाऱ्याने काही लोकांना ओलीस ठेवले. नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडत सहाजणांचा जीव घेतला. मात्र पोलिसांनी नंतर गोळ्या झाडून हल्लेखोराला ठार केले. या घटनेवर भाष्य करताना युक्रेनच्या गृह मंत्रालयाचे प्रमुख इहोर क्लिमेंको म्हणाले की, पोलिसांच्या एका विशेष पथकाने ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु चर्चेतील वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी दुकानात प्रवेश केला. त्यावेळी बंदूकधारी व्यक्तीने पोलिसांना शरण जाण्यास विरोध केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.

हल्लेखोराशी पोलिसांची ४० मिनिटे चर्चा

ही घटना युक्रेनच्या होलोसिव्हस्की जिल्ह्यात घडली. इहोर क्लिमेंको यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इमारतीत घुसण्यापूर्वी पोलीस मध्यस्थांनी हल्लेखोराशी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. "आत कोणीतरी जखमी असू शकते हे आम्हाला माहीत होते, त्यामुळे आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला," असे ते म्हणाले.

रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आम्ही पट्टी आणण्याची तयारीही दर्शवली, पण त्याने प्रतिसाद दिला नाही. परिणामी, त्याला ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान बंदूकधाऱ्याने सुपरमार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यावरील चार लोकांना ठार केले आणि त्यानंतर पाचव्या व्यक्तीची हत्या केली.

महापौर विटाली क्लिचको यांनी सांगितले की, ६ व्यक्ती एक तरुणी होती, रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हल्लेखोराकडे व्यक्तीकडे कायदेशीररित्या नोंदणीकृत कार्बाइन होते. दरम्यान डिसेंबर २०२५ मध्ये त्याने परवाना रद्द झाल्यानंतर शस्त्राची चाचणी करून घेण्यासाठी त्याने परवाना प्राधिकरणाशी संपर्क साधला होता, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाचे इहोर क्लिमेंको यांनी सांगितले. त्याने वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर केले. तसेच त्याने त्याच्या शस्त्र परवान्याच्या नूतनीकरणासाठी अर्जही दाखल केला. सध्या आम्ही एवढेच सांगू शकतो." त्यांनी पुढे सांगितले .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT